मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मुंबईत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एस आय आर) – २०२६ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीत नाव नसल्यास किंवा नोंदीबाबत आक्षेप असल्यास दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. या अनुषंगाने, नवमतदारांची नोंदणी, प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांची नोंदणी, नोंदीत सुधारणा व नाव वगळणे आदी बाबतीत मतदारांच्या सुलभतेसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात दिनांक २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. बृहन्मुंबईतील सर्व विधानसभा मतदार संघातील पदनिर्देशित ठिकाणी हे शिबिर पार पडतील. मुंबईतील मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आहे. (Mumbai Voter List 2026)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर आली ...
गैरहजर/स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे काही मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. भारत निवडणूक आयोग तथा माननीय मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशांनुसार, अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणांहून मतदार यादीत नव्याने नाव अंतर्भूत करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती सादर करता येणार आहेत.
येत्या ०१ ऑक्टोबर २०२६ किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव अंतर्भूत करण्याची सुविधा आता उपलब्ध झालेली आहे. या अनुषंगाने, मुंबईतील नवमतदार तसेच पात्र असून मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, मतदार यादीतील अस्तिात्वात असलेल्या नोंदीत सुधारणा करणे तसेच यादीतील नाव वगळणे, यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाच्या दावे व हरकती कालावधीत २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व विधानसभा मतदार संघातील पदनिर्देशित ठिकाणी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. (Mumbai Voter List 2026)
नागोया: जपानमधील आयची येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. उपांत्य ...
दरम्यान, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी किंवा प्रारुप मतदार यादीत नाव वगळले गेले असल्यास मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना (फॉर्म) क्रमांक-६, तपशीलातील दुरुस्ती दिव्यांगत्वाची नोंद किंवा स्थलांतरासाठी नमुना क्रमांक -८ तसेच मतदार यादीत नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक- ७ उपलब्ध आहेत. सदर नमुना अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून प्राप्त करता येतील. तसेच, ऑनलाईन अर्जासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा किंवा ECINET या मोबाइल अॅपचा वापर करता येईल. (Mumbai Voter List 2026)
विशेष नोंदणी शिबिरामध्ये अर्जासंदर्भातील सुविधा उपलब्ध असून मतदारांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आहे.