Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करा!

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना निर्देश


मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षातील सर्व मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ( Deputy CM Sunetra Pawar)


नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे सोडू नका. त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घ्या, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करा आणि आवश्यक प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा करा, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिल्या.



“शेतकरी अडचणीत असताना आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐका, त्यांना धीर द्या आणि शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देशही दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ता हा शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासोबत आहे, हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.

Comments
Add Comment

Mumbai Accident : कोलाब्यात दोन दुचाकींची जोरदार धडक; अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई : दक्षिण मुंबईतील कोलाबा परिसरात दोन दुचाकींची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू

Diabetes Free Mumbai : भाजपच्या ‘मधुमेहमुक्त मुंबई' अभियानाचा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; एकाच दिवशी २८७ आरोग्य शिबिरांमध्ये ७९ हजार ३०६

BMC News : फेरीवाल्यांवरील कारवाईत महापालिका व पोलिसांत समन्वयाचा अभाव!

विधी समितीच्या बैठकीत सदस्यांनी व्यक्त केली नाराज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस

Deepak Sawant : महापालिका सदस्यत्व रद्द, तरीही उबाठाच्या दिपक सावंत नावापुढे नगरसेवक पदाचा उल्लेख

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे उबाठाचे प्रभाग क्रमांक १११चे

Mumbai Illegal Construction : मुंबईतील अनधिकृत बांधकामांना नगरसेवकांचा पाठिंबा?

झोपड्यांचे वाढलेले ईमेल पाहून स्वस्थ बसा! प्रशासनावर आधी आरोप करायचे आणि कारवाई हाती घेताच विरोध करायचा मुंबई

FDA Action: भेसळखोरांचे धाबे दणाणले! FDAने केलेल्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त, पाच अस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुंबई, चंद्रपूर, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धडक कारवाई करत भेसळयुक्त