गणेशोत्सवाच्या सुट्टीवर आलेल्या बीएमसी अधिकाऱ्याला संपवलं; मध्यरात्री 'तिच्या' घराबाहेर घडलेल्या थरारानं मुंबईसह नाशिकमध्ये खळबळ

नाशिक: गणेशोत्सवाच्या सुट्टीसाठी आपल्या मूळ गावी आले असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची भीषण घटना समोर आली आहे. या थरारक घटनेमुळे मुंबई आणि नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून आणि वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.(BMC officer murder)



नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बीएमसी अधिकारी गणेशोत्सवानिमित्त सजेच्या सुट्ट्या काढून आपल्या इगतपुरी तालुक्यातील गरुडेश्वर या मूळ गावी आले होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते गावातीलच एका संशयित महिलेच्या घराजवळ गेले होते आणि तिच्याशी बोलत उभे होते. दरम्यान, त्या दोघांना रात्रीच्या वेळी एकत्र बोलताना पाहून महिलेच्या तरुण मुलांना तीव्र संताप अनावर झाला.(BMC officer murder)


त्यानंतर त्या महिलेने आणि तिच्या दोन्ही मुलांनी संगनमत करून संबंधित अधिकाऱ्यावर अचानक लाठ्याकाठ्यांनी बेदम हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, मारहाणीदरम्यान अधिकाऱ्याच्या डोक्यात एका टणक वस्तूने जबर प्रहार करण्यात आला. गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि अतिरक्तस्राव झाल्यामुळे ते अधिकारी रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले, आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.



पोलिसांची तात्काळ कारवाई


या गंभीर घटनेची माहिती मिळताच मृत अधिकाऱ्याच्या पुतण्याने तातडीने पोलिसांत धाव घेत फिर्याद नोंदवली. माहिती समजताच वाडीवऱ्हे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने पावले उचलत संशयित महिला आणि तिच्या दोन्ही तरुण मुलांना ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकल्या.


पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास वाडीवऱ्हे पोलिसांकडून केला जात असून, हत्येमागील इतर कारणांचा शोध घेतला जात आहे. एका सण-उत्सवाच्या काळात घडलेल्या या खून सत्रामुळे ग्रामीण भागात एकच दहशत पसरली आहे.(BMC officer murder)

Comments
Add Comment

Donald Trump : इराणसोबत पुन्हा युद्ध टाळण्याचे ट्रम्प यांचे संकेत; म्हणाले, ‘भक्कम करार झाल्यास हल्ल्याची गरज नाही’

Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाबाबत नरम भूमिका घेण्याचे संकेत

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची उघडीप; दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा, पुढील 5 दिवस हवामान कोरडे

Maharashtra Weather News: राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता हवामानात बदल जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने

Dongri Fire: डोंगरीतील नूर बाग परिसरात मध्यरात्री भीषण आग, दुकाने आणि काही झोपड्यांचे मोठे नुकसान

मुंबई : मुंबईत 8 नोव्हेंबरच्या रात्री डोंगरी आणि अंधेरी पूर्व परिसरात गॅरेजला आग लागल्याच्या दोन घटना घडल्या. या

Devendra Fadnavis Farmer Visit: शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी; भाऊबीजेला अरुणाताईंची खास विनंती

Nagpur:  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण दिवसभर नागपूर येथील दुष्काळग्रस्त

इस्रायलमध्ये नेतान्याहू यांना सत्तेचा धक्का! गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेची संधी; बहुमत सिद्ध करण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत

जेरुसलेम : इस्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सत्तेला आव्हान

दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना उपमुख्यमंत्री शिंदे भावुक, म्हणाले, ''हीच खरी दिवाळी''

आपल्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांच्या मनात आशेचा दिवा लावणे हीच खरी दिवाळी असल्याचे मत