मीडिया रिपोर्टनुसार, अहमदाबादच्या मेघानीनगरमध्ये 71 वर्षीय निवृत्त व्यापारी राहतात. त्यांना 15 सप्टेंबरला व्हॉट्सअप निमंत्रण पत्रिका आली होती. हा मेसेज ओळखीच्या नंबर आल्याने त्यांना संशय घेण्याचं कारण नव्हतं. त्यांनी कार्डवर क्लिक केलं आणि APK फाईल डाउनलोड झाली. त्यानंतर त्यांना आलेला मेसेज आपोआप इतर व्हॉट्सॲप नंबरवर पाठवणं सुरू झालं. हा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना बँकेतून पैसे गेल्याचे मेसेज आले. तेव्हा त्यांना कळलं की दोन खात्यातून एकूण 6.4 लाख रुपये काढले गेले आहेत.
APK फाईल नेमकी काय असते?
अँड्रॉईड फोनमध्ये एपीके ॲप इंस्टॉल करण्यासाठी एक फाई असते. ही फाईल गुगल प्ले स्टोरवरून इंस्टॉल केली जाते. पण जेव्हा अनोळखी एपीके व्हॉट्सॲप किंवा दुसऱ्या मेसेजिंग ॲपवरून येते आणि इंस्टॉल करताच ती फोनची परमिशन मागू शकते. या माध्यमातून सायबर चोरट्यांनी मोबाईलवर नियंत्रण मिळवलं आणि बँकेची माहिती चोरली. इतकंच काय तर ओटीपीही इंटरसेप्ट केला.
मुंबई : मोबाईल ग्राहकांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘टेलिकॉम ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) नियम, २०२६’ ...
या चुका करू नका
व्हॉट्सॲवरून आलेली कोणतीही एपीके फाइल इंस्टॉल करू नका. लग्नाचं निमंत्रण देणारी पत्रिका पीडीएफ, जेपीजी, पीएनजी किंवा व्हिडीओ स्वरूपात येते. ओळखीच्या व्यक्तीकडून पत्रिका आली असेल तर ती पत्रिका ओपन करण्यापूर्वी एकदा त्यांना कॉल करा. फोनमध्ये अनोळखी ॲप इन्स्टॉल झाले असतील ते ताबडतोब काढून टाका. इतकंच काय तर बँक अॅपचा पासवर्ड बदला. तुमच्या खात्यातून पैसे गेले असल्यास तात्काळ 1930 सायबर हेल्पलाइनवर तक्रार करा. फसवणुकीची माहिती मिळताच बँकेला खातं फ्रिज करण्यास सांगा.