Maharashtra Farmer News: शेतकऱ्यांना पीक विमा, कर्जमुक्तीसह शासनच्या योजनांचा लाभ प्राधान्याने देणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुंबई: "दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, पीक विमा, कर्जमुक्ती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात पुढील दोन तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात येणार आहे", अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी दिली.


दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात अधिसूचना काढणार


संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर जाऊन कृषीमंत्री भरणे यांनी नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाचा खंड, पिकांची अवस्था आणि शेतीसमोरील अडचणी जाणून घेतल्या. पिंपळे गावातील काही शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत येत असलेल्या अडचणींची तातडीने दखल घेत कृषी व महसूल विभागाने चालू खरीप हंगामात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. सोयाबीनची 113.03 टक्के, कपाशीची 91.66 टक्के, मक्याची 163.34 टक्के, तुरीची 134.32 टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून पाण्याच्या ताणामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.



या पार्श्वभूमिवर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण, पुणे महसूल विभागातील पिकं, पाणी आढावा घेतल्यानंतर कृषीमंत्री नाशिक महसूल विभागाच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक विभगातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके अडचणीत आली असून, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. शेतीसोबतच पशुपालन, चारा आणि पाणीटंचाईवरही तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागामार्फत सर्वसमावेशक अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“मी स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या वेदना मला माहिती आहेत. या संकटात शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी असून, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली शासनाची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत,” असे भरणे यांनी सांगितले. यावेळी आमदार अमोल खताळ, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह कृषी, महसूल, महावितरण व ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
Comments
Add Comment

व्हाट्सॲपवर आलं लग्नाचं निमंत्रण आणि उघडताच 6.4 लाख रुपये गायब, प्रकरण वाचून आवाक् व्हाल

तुम्हाला व्हॉट्सॲपवर लग्नाचं निमंत्रण देणारी पत्रिका आली आहे का? तर ती डिजिटल पत्रिका ओपन करण्यापूर्वी जरा

Nashik Kumbh Mela 2027 : 31 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सिंहस्थाचा शुभारंभ, 6 हजार आदिवासींच्या हस्ते गोदा आरती

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. कुंभमेळ्याचा

Xi Jinping Trump meeting : "स्पर्धक नव्हे, भागीदार बनूया" अमेरिका-चीन संबंधांवर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे मोठे वक्तव्य

वॉशिंग्टन: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आपल्या अमेरिका दौऱ्यावर वॉशिंग्टन येथे दाखल झाले आहेत. यावेळी

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांना दिलासा; विसर्जनाच्या दिवशी रात्रभर धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, रेल्वेचंही जाणून घ्या अपडेट

मुंबई: मुंबई मेट्रो 3 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणपती

Shak: Trust No One Review : मुलीच्या शोधात निघालेली एक जिद्दी आई! परिणीती चोप्राच्या थ्रिलरमध्ये उत्कंठा आणि सस्पेन्स; पण...

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) नेटफ्लिक्सवरील 'शक: ट्रस्ट नो वन' (Shaque: Trust No One) या नवीन मिस्ट्री-थ्रिलर

Google Fitbit Air : 'गुगल फिटबिट एअर' भारतात 2 ऑक्टोबरला लॉन्च; लाँचपूर्वीच Flipkart वर किंमत लीक

मुंबई : Google चा स्क्रीन-फ्री फिटनेस ट्रॅकर Fitbit Air जागतिक पदार्पणानंतर आता भारतात दाखल होणार आहे. हे डिव्हाइस 2 ऑक्टोबर