Goregaon Fire : गोरेगावमध्ये 8व्या मजल्यावरील घराला आग; परिसरात खळबळ

एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज


मुंबई : मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात गुरुवारी सकाळी एका इमारतीच्या 8व्या मजल्यावरील घराला आग लागल्याची घटना घडली. न्यू लिंक रोडवरील भगतसिंग नगर क्रमांक 2 येथील हार्मनी रेसिडेन्सीमध्ये सकाळी 6.20 वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हार्मनी रेसिडेन्सी ही G+8 मजली इमारत आहे. इमारतीच्या 8व्या मजल्यावरील एका खोलीत आग लागली. एसी युनिटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.


मुंबई अग्निशमन दलाने सकाळी 6.28 वाजता या आगीला Level 1 म्हणजेच LI श्रेणीतील आग म्हणून घोषित केले. आग एका खोलीपुरती मर्यादित असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात आली.


घटनेनंतर अग्निशमन दलासोबतच पोलिस, संबंधित वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, 108 रुग्णवाहिका आणि BMC च्या वॉर्ड कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आगीमुळे कोणालाही दुखापत झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.


दरम्यान, आगीचे नेमके कारण आणि या घटनेत किती नुकसान झाले, याबाबत अधिक माहिती मिळणे बाकी आहे.


Comments
Add Comment

Dongri Fire: डोंगरीतील नूर बाग परिसरात मध्यरात्री भीषण आग, दुकाने आणि काही झोपड्यांचे मोठे नुकसान

मुंबई : मुंबईत 8 नोव्हेंबरच्या रात्री डोंगरी आणि अंधेरी पूर्व परिसरात गॅरेजला आग लागल्याच्या दोन घटना घडल्या. या

GMLR प्रकल्पांतर्गत 'विहार' टनेल बोरिंग मशीनद्वारे दुसऱ्या भूमिगत बोगद्याचे खोदकाम सुरू, संपूर्ण प्रोजेक्टची वाचा अपडेट

मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा 3 (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) जमिनीखालून

शहाडचा रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कायमची फुटणार, कल्याण- मुरबाड- उल्हासनगरचा प्रवास सुसाट; मेगा प्रोजेक्टला मंजुरी

कल्याण: कल्याणवरून मुरबाड आणि उल्हासनगरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी

Farmers Visit: आदिवासी पाड्यात चिमुकल्यांना भेटवस्तू देत मंत्री मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी

Mumbai:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला मध्यनजर ठेऊन राज्यातील मंत्री दुष्काळग्रस्त भागात

कस्टम अधिकारी बनून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लुटणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश; मुंबईत 3 जण गजाआड!

मुंबई: परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांना गाठून, बनावट ओळखपत्रांच्या आधारे त्यांची लुटमार करणाऱ्या एका

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! अखेर कल्याणमध्ये सुरू होणार 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय', फेऱ्यांचा त्रास संपणार

ठाणे: ठाणे जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार आणि जिल्हा मुख्यालयाचे असलेले लांब अंतर यामुळे कल्याण, उल्हासनगर,