Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीची संपूर्ण रूपरेषा जाहीर; पोलिसांना विशेष सलामी!

मुंबई : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि मुंबईची शान असलेल्या 'लालबागच्या राजा'च्या (lalbuagcha Raja Visarjan 2026) विसर्जन सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने २५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या भव्य आणि राजेशाही विसर्जन मिरवणुकीचे संपूर्ण वेळापत्रक आणि मार्ग जाहीर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना अनोखी सलामी देत, विविध वस्त्यांमधून आणि धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडवत ही मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.



असं असेल २५ सप्टेंबरला विसर्जन


सकाळी ९:०० वाजता : लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला अधिकृतपणे सुरुवात होईल.


सकाळी १०:०० वाजता : बाप्पाची पारंपरिक आणि विधीवत उत्तरपूजा संपन्न होईल.


दुपारी १२:०० वाजता : उत्तरपूजेनंतर लालबागच्या राजाची प्रसिद्ध 'राजेशाही विसर्जन मिरवणूक' मंडपातून बाहेर पडेल.


दुपारी १:०० वाजता : बाप्पाचे आगमन मुख्य प्रवेशद्वाराजवळ होईल.



'माणूस उभा आहे वर्दीतला… म्हणून उत्सव साजरा होतोय गर्दीतला!'


दुपारी १ वाजता मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन झाल्यानंतर, संपूर्ण सणात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सन्मानार्थ लालबागच्या राजाच्या वतीने मुंबई पोलिसांना विशेष सलामी दिली जाणार आहे.



असा असेल राजेशाही मिरवणुकीचा मार्ग :


लालबागच्या राजाची मिरवणूक लालबाग मार्केटमधून निघून पुढील ऐतिहासिक आणि प्रमुख मार्गांवरून पुढे सरकेल:


मुख्य प्रवेशद्वार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भारतमाता सिनेमा, लालबाग पोलिस चौकी, पुन्हा लालबाग मुख्य प्रवेशद्वार.


श्रॉफ बिल्डिंग : येथे दरवर्षीप्रमाणे बाप्पावर विलोभनीय पुष्पवृष्टी केली जाईल.


चिंचपोकळी ब्रिज, भायखळा रेल्वे स्टेशन, हिंदुस्थान मशीद.


मुंबई अग्निशमन दल मुख्यालय : या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्यांचे सायरन वाजवून बाप्पाला शिस्तबद्ध सलामी दिली जाईल.


खडा पारसी, दोन टाकी : या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून लालबागच्या राजाला पारंपरिक पद्धतीने पुष्पहार अर्पण करून स्वागत केले जाईल.


कुंभारवाडा, सुतार गल्ली, माधव बाग, व्ही. पी. रोड, प्रार्थना समाज, गिरगाव चौपाटी सिग्नल, मुंबई महापालिका स्वागत कक्ष (गिरगाव चौपाटी), लालबागचा राजा विसर्जन तराफा.



२६ सप्टेंबर : अरबी समुद्रात अंतिम विसर्जन


रात्रभर चालणाऱ्या या अलोट जनसागराच्या आणि ढोल-ताशांच्या गजरातील मिरवणुकीनंतर, २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक खास तयार करण्यात आलेल्या तराफ्यावरून अरबी समुद्रात पुढे सरकेल आणि बाप्पाला अश्रूपूर्ण नयनांनी, "पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात निरोप दिला जाईल.

Comments
Add Comment

Maharashtra Farmer News: शेतकऱ्यांना पीक विमा, कर्जमुक्तीसह शासनच्या योजनांचा लाभ प्राधान्याने देणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुंबई: "दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी

Shivprakash : शिवप्रकाश यांच्याकडे महाराष्ट्रासह पाच राज्यांची जबाबदारी

- भाजपकडून संघटनात्मक फेरबदल; अजय जामवाल प्रदेश महासचिव, सतीश धोंडांकडे जनजाती संपर्काची धुरा मुंबई : भाजपने

इस्राईलमध्ये मतदार यादीतून मुस्लिमांना वगळण्याची तयारी, नेतन्याहू यांच्या पक्षाने टाकले फासे

इस्राईलमध्ये 38 वर्षांनंतर पहिल्यांदाच सरकार मुदतपूर्व विसर्जित न होता, आपला पूर्ण कार्यकाळ संपवून नियोजित

Maharashtra Political News : एकदा जनतेतून निवडणूक लढवा, स्वतःची लायकी कळेल!

- खासदार ओमराजेंचा अंबादास दानवेंना टोला; मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरील टीकेला

Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त; 2000 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

नवी मुंबई: गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 1044

IIT Bombay Mid Sem Exam : आयआयटी मुंबईच्या मध्य-सत्र परीक्षा 10 आणि 11 ऑक्टोबरला; विद्यार्थी आंदोलनानंतर संस्थेचा मोठा निर्णय

मुंबई: आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी