BMC officer suspension : महापालिकेच्या त्या वसाहत अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करा

कारवाईचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्याचे अध्यक्षाचे निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गरीब झोपडीधारकांची फाईल मंजूर करण्यासाठभी पाच ते दहा लाखांची बोली लावून त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते अमेय घाेले यांनी केल्यानंतरही एफ उत्तर विभागातील कॉलनी अधिकारी अजूनही तिथे येवून जुन्या तारखांच्या नावे स्वाक्षरी करत असल्याचा व्हिडीओच स्थायी समितीला सादर केला. त्यामुळे आयुक्त आणि आयुक्त हे लोकप्रतिनिधींचे ऐकत नाही आणि आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांचे खालचे अधिकारी ऐकत नाही अशी परिस्थिती झाल्याचे सांगत स्थायी समिती अध्यक्षांनी या तिन्ही अधिकाऱ्यांचे त्वरीत निलंबन करून त्याचा अहवाल समितीला सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.



स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे शिवसेना पक्षाचे महापालिका गटनेते अमेय घोले यांनी .एफ उत्तर विभागातील तीन कॉलनी अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत हे गरीब झोपडीधारकांकडून ५ ते १० लाख रुपयांची मागणी करत त्यांची लूट करत आहे.शासनाने एसआरए प्रकल्पातील कुटुंबांकरता अभय योजना जाहीर केली आहे. यामध्ये महापालिकेच्या मालमत्तांमधील योजनांमधील परिशिष्ट दोनसंदर्भातील नोंदी या महापालिकेकडे असल्यामुळे त्या नोंदीची दखल घेवून फाईल बनवून देण्यासाठी ही पैशांची मागणी होत आहे. त्यामुळे एकप्रकारे गरीब कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागत असून जी कुटुंबे त्यांची मागणी पूर्ण करत नाही त्यांची फाईल बनवली जात नाही. त्यामुळे माझ्या विभागात ३५० कुटुंबांची कामे अडकली गेली आहेत. आम्हाला याची उत्तरे मिळणार नसतील तर असल्या स्थायी समितीत मी आजपासून बसणार नाही, मी या स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार घालतो. हा प्रकार एका एफ उत्तर विभागापुरता सिमित नसून संपूर्ण संपूर्ण मुंबईत असेच प्रकार सुरु आहेत. त्यामुळे असला भ्रष्टाचार आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही,असे सांगत त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला होता.


या हरकतीच्या मुद्याबाबत प्रशासनाकडून आलेल्या उत्तराच्या अनुषंगाने पुन्हा हरकतीचा मुद्दा काढून आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांचे आदेश खालचे अधिकारी मानत नसल्याचे सांगितले. काही सुट्टीवर असतानाही एफ उत्तर विभागात येवून जुन्या तारखांच्या नावे स्वाक्षरी करत आहेत. तर जन्म दाखल्याच्या नावाखाली कुणी भलताच अशाप्रकारे परिशिष्ट दोनच्या फाईल्स हाताळत आहे. याचे व्हिडीओ सादर करत कॉलनी अधिकारी असलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांनी बाहेरचे एजंट बसवून गरीब लोकांकडून पाच ते दहा लाख रुपये पैसे उकळण्याचा धंदा थाटला आहे. त्यामुळे याची चौकशी व्हायला हवी की खाली नक्की काय घडते ते. कारण ही गरीब जनता आमचे मतदार असून ही अभय योजना सरकारने जाहीर केली आहे, तर त्या गरीबांची लूट आम्ही उघड्या डोळयांनी कशी पहायची असा सवाल केला. याला शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी अशाप्रकारे दलाल महापालिकेच्या कार्यालयात येत असतील आणि गरीब जनतेची पिळवणूक करत असतील तर त्यांची चौकशी व्हायला हवी. त्यांना त्वरीत निलंबित करायला हवे तसेच कॉलनी ऑफिसरच्या कार्यालयात सीसी टिव्ही कॅमेरे बसवा अशी मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. जर हे अधिकारी आयुक्तांना जुमानत नसतील तर ती मोठी शोकांतिका असून महापालिकेचे काही अधिकारी आपला धंदा कसा चालेल याचाच विचार करत असतात, त्यामुळे हे प्रकरण निकालात निघेपर्यंत याचा पाठपुरावा केला जावा. अभय योजना सामान्य माणसांसाठी असून ज्या ज्या वसाहत अधिकाऱ्यांची नावे त्यांनी जाहीर केली आहे त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल पुढील बैठकीत सादर केला जावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Goregaon Fire : गोरेगावमध्ये 8व्या मजल्यावरील घराला आग; परिसरात खळबळ

एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई : मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात गुरुवारी सकाळी

BMC Action : झोपड्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईबाबत स्थायी समितीत तीव्र नाराजी

तुघलकीय निर्णय नको,लोकप्रतिनिधींशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घ्या! मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका

Malabar Hill Reservoir : मलबार हिल टेकडीवर नवीन जलाशय, पण ३०८ झाडे वाचवून

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मलबार टेकडी जलाशय टाकीचे बांधकाम तोडून त्याठिकाणी नव्याने जलाशय उभारताना

Women Empowerment : महिला बचत गटांना खेळते भांडवल वाढवून द्या..

बचत गटांना २५ हजार खेळत भांडवल देण्यासाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर स्थायी समितीत प्रस्तावाला मिळाली

BMC Ganesh Gaurav Award : अंधेरीतील स्वप्नाक्षय मित्र मंडळ पुन्हा एकदा अव्वल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२६’मध्ये

Mumbai Voter List 2026 : नवमतदार नोंदणी आणि मतदार यादीतील नोंदीत दुरुस्तीसाठी २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मुंबईत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एस