Jalgaon Crime News : संतापजनक ! पैशांसाठी 72 वर्षीय मालकीणीचा खून, सालगड्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Jalgaon Crime News : पैशांची गरज भागविण्यासाठी ७२ वर्षीय मालकीणीचा खून केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील दोधा गावात समोर आली आहे. शेतमालक कुटुंबाकडे सालगडी म्हणून काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणावर या हत्येचा संशय असून, रावेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ललिताबाई वसंत पाटील (वय ७२) असे मृत महिलेचे नाव आहे, तर लाला धर्मा भिलाला (वय १९) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.



घरात एकट्या असल्याची संधी साधली


पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, लाला भिलाला हा दोधा येथील पाटील कुटुंबाकडे सालदार म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. तिने पतीकडे ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पैशांची गरज असल्याने ललिताबाई यांच्या अंगावरील दागिने लुटण्याचा विचार त्याच्या मनात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.



बेल्टने गळा आवळल्याचा आरोप


दोधा येथील पाटील कुटुंबाच्या घरात ललिताबाई पाटील या दुपारी एकट्या असल्याची संधी साधून सालगडी लालाने घराच्या मागील बाजूने प्रवेश केला. घरात आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री केल्यानंतर त्याने ललिताबाई यांच्यावर हल्ला केला. तसेच स्वतःच्या अंगावरील बेल्टच्या साहाय्याने ललिताबाई यांच्या गळ्याला आवळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लालाने त्यांच्या गळ्यातील दोन हार आणि एका कानातील दागिना काढून घेतला. घटनास्थळावरून तो लागलीच पसार झाला. घटनेनंतर सालगडी लालाने नेहमीप्रमाणे वावरत पोलिसांना संशय येऊ नये, असा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.



अन् रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली


मात्र, घटनेची माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील संशयित व्यक्तींची माहिती घेण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांचा संशय लाला भिलालाकडे गेला. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तपास केला.परिसरातील व्यक्तींकडून माहिती घेत असताना पोलिसांचा संशय लाला भिलालाकडे गेला. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याने दागिने लपविल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून काही दागिने हस्तगत केले आहेत.



आर्थिक कारणाचा तपास सुरू


या प्रकरणात चोरी गेलेला मुद्देमाल आणि खुनामागील नेमका उद्देश याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. संशयिताने गुन्ह्याचे नियोजन कसे केले, घटनेपूर्वी आणि त्यानंतर त्याची हालचाल काय होती, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे दोधा परिसरात खळबळ उडाली असून, वृद्ध महिलेच्या हत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Samastipur Crime News : पुन्हा एकदा 'जमुई कांड'! अल्पवयीन मुलाचा भरदिवसा छळ, व्हिडिओ व्हायरल होताच 4 आरोपी अटकेत

बिहार : बिहारमधील जमुई कांड ताजं असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. भरदिवसा एका अल्पवयीन मुलीचा छळ

Nashik Crime News : BMC अधिकाऱ्याची इगतपुरीत हत्या ! महिलेसह तिच्या दोन मुलांना अटक; हत्येचे धक्कादायक कारण समोर

Nashik Crime News : गणेशोत्सवाच्या सुट्टीसाठी मूळ गावी आलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) एका अधिकाऱ्याची इगतपुरी तालुक्यात

Dhule Crime News : शेती विभागात काम करताना शिक्षा बंदी फरार, धुळे जिल्हा कारागृहात खळबळ

Dhule Crime News : धुळे जिल्हा कारागृहातून शिक्षा भोगत असलेला एक बंदी कारागृहाच्या शेती विभागात काम करत असताना सुरक्षा

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा वाढली; हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटने पुन्हा लांबणीवर

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या

Nagpur Crime : मुलांच्या किरकोळ भांडणाचा रक्तरंजित शेवट ! लोखंडी रॉडच्या हल्ल्यात 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Nagpur Crime News : लहान मुलांमध्ये खेळताना झालेल्या किरकोळ वादाने गंभीर रूप घेतल्याची धक्कादायक घटना नागपुरातील खरबी

Kolhapur Accident News: कानातील इअरबड्स ठरले जीवघेणे ! रेल्वे रुळावर इअरबड्स लावले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Kolhapur Accident News : रेल्वे रुळावरून चालताना मोबाईलवर बोलणे आणि कानात इअरबड्स असणे एका १७ वर्षीय तरुणीच्या जीवावर