मुंबई: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबई महापालिकेकडून नागरिकांसाठी कृत्रिम विसर्जन तलावांची विभागनिहाय माहिती महापालिकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देण्यात आली आहे. यंदा बीएमसीने 383 हून अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यांवर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून 67 ठिकाणी नैसर्गिक ठिकाणीही गणरायाच्या विसर्जनाची तयारी जोरदार करण्यात आली आहे. मुंबई आणि शहरामध्ये कोणत्या परिसरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे, जाणून घेऊया...
Navi Mumbai Accident: ट्रान्स हार्बर रेल्वे विस्कळीत, नवी मुंबईमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; वाचा अपडेट
नवी मुंबई: उरण- बेलापूर रेल्वे मार्गिकेवर मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गिका विस्कळित झालेली आहे. गुरूवारी दुपारी ...
बीएमसीकडून एक्स अकाऊंटवर कृत्रिम विसर्जन तलावांची थेट यादीच जाहीर करण्यात आली आहे. तुमच्या परिसरामध्ये कुठे कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे, याचा तपशील त्या यादीमध्ये देण्यात आला आहे. शिवाय, क्यू आर कोड सुद्धा देण्यात आला आहे. त्याला स्कॅन करून तुम्ही कृत्रिम तलावांची माहिती मिळवू शकणार आहेत. मुंबई आणि उपनगरामध्ये कोणकोणत्या परिसरामध्ये कृत्रिम तलाव आहे, याची माहिती गणेशभक्तांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे गणेशभक्तांची धावपळ होणार नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आणि घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी एकच गर्दी असते. सर्वांना सोयीस्कर व्हावं यासाठी बीएमसीने कृत्रिम तलावांच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये गणपती विसर्जनासाठी बीएमसीसोबतच मुंबई पोलिसांनी आणि अग्निशमन दलाकडूनही जोरदार तयारी केली जात आहे. सर्वच स्तरातून विसर्जन सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. चौपाट्यांवर नागरिकांसाठी आणि पोलिसांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डाच्या आकारणीप्रमाणे बीएमसीने कृत्रिम तलाव बनवले आहेत. काही वॉर्डांमध्ये एकाच वेळी 10 ते 12 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तर, काही वॉर्डांमध्ये फक्त 3 ते 4 इतक्याच कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आपल्या घराजवळ असणाऱ्या तलावाजवळ आणि आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या तलावाजवळच पसंदीचं करावी, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.
Ganeshotsav 2026: गणेशभक्तांना दिलासा; विसर्जनाच्या दिवशी रात्रभर धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, रेल्वेचंही जाणून घ्या अपडेट
मुंबई: मुंबई मेट्रो 3 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी मुंबई मेट्रो लाईन 3 (Aqua ...
विसर्जनाच्या काळामध्ये काही अघटित घडू नये, यासाठी बीएमसीकडून मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाची टीम तैनात केली आहे. इतकंच नाही तर, कृत्रिम तलाव, नैसर्गिक तलाव आणि समुद्र याठिकाणी गणपती मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी सामान्य नागरिकांनी न जाता, ज्यांना व्यवस्थित प्रशिक्षण असणाऱ्यांनीच उतरण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी तलावाजवळ आणि समुद्राजवळ पोलिसांची आणि अग्निशमन दलाची सुद्धा टीम तैनात केली जाणार आहे.