Monday, November 9, 2026

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा 'एक हात मदतीचा'

महापौर निधीमध्ये आपल्या पाच वर्षांच्या कालावधीतील प्रत्येक महिन्याचे प्रत्येकी 25 हजाराचे मानधन जमा करून गरीब गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचे कौतुक होत असतानाच त्यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

मुंबई, (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्राचा कणा असलेला बळीराजा आज निसर्गाच्या लहरीपणाशी आणि कठीण काळाशी झुंज देत आहे. अशा या संकटकाळात अन्नदात्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा दिसून आली आहे. महापौर निधीमध्ये आपल्या पाच वर्षांच्या कालावधीतील प्रत्येक महिन्याचे प्रत्येकी 25 हजाराचे मानधन जमा करून गरीब गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचे कौतुक होत असतानाच त्यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे चेक सुपूर्द

शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा देण्यासाठी तब्बल 2.50 लाखांचा निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला. दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या माणसांसोबत वाटून घेण्याच्या भावनेतून नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2,50,000 रुपये (अडीच लाख रुपये) चा भरीव निधी सुपूर्द केला. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले, “शेतकरी सुखी तर महाराष्ट्र समृद्ध! अन्नदात्यांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी दिवाळी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देऊन मी माझी जबाबदारी पूर्ण केली.”

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ निवारण आणि शेतकरी कुटुंबांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी शासन पातळीवर सुरू असलेले प्रयत्न अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत तिवाना यांनी मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील भूमिकेचे कौतुक केले. “शेतकरी सुखी तर महाराष्ट्र समृद्ध!” या विचारावर खरी मोहोर उमटवत बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावणे हीच खरी काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या योगदानामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्याच्या मोहिमेला आणखी बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >