Navi Mumbai Traffic : अनंत चतुर्दशीनिमित्त नवी मुंबईमध्ये वाहतुकीत मोठे बदल; घरगुती प्रवाशांसाठी महत्त्वाचे रस्ते बंद, पर्यायी मार्गांची घोषणा

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी सर्वत्र तयारी सुरू आहे. यादरम्यान, गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडाव्यात आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. सुरक्षेची काळजी घेत पोलिसांनी शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते आणि मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून, खारघर व कळंबोली परिसरात विशेष वळणमार्ग (पर्यायी मार्गांची) घोषणा करण्यात आली आहे.(Navi Mumbai Traffic)


मिळालेल्या माहितीनुसार, हे वाहतूक निर्बंध २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून लागू होणार असून, विसर्जन मिरवणुका पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. हे निर्बंध निर्धारित मार्गांवरील गणेश विसर्जन वाहने, पोलीस वाहने, शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने वगळता इतर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांना लागू असणार आहेत. “अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाहनांची मोठी वर्दळ अपेक्षित असल्याने रहिवाशांनी प्रतिबंधित मार्ग टाळावेत आणि प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा,” असे आवाहन नवी मुंबईचे पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. राहुल खाडे यांनी केले आहे.



खारघरमधील बंद रस्ते आणि वळणमार्ग


खारघर परिसरात, डी-मार्ट सिग्नल आणि डीएव्ही इंटरनॅशनल स्कूलच्या कोपऱ्यादरम्यान दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच खारघर गाव मेट्रो स्टेशन आणि दिवंगत सुदाम भिकाजी पाटील कमानीसमोरील कामधेनू कॉम्प्लेक्समागील रस्ताही बंद राहील.(Navi Mumbai Traffic)


पर्यायी मार्ग: डी-मार्ट सिग्नलकडून डीएव्ही स्कूलकडे जाणारे नागरिक सेक्टर १८ आणि १९ मार्गे जाऊ शकतात. तर विरुद्ध दिशेने जाणारे वाहनचालक वास्तुविहार चौकात उजवीकडे वळून बालाजी स्वीट्स, शिल्प चौक आणि डी-मार्ट मार्गे पुढे प्रवास करू शकतात.



कळंबोली विसर्जन मिरवणूक मार्ग


कळंबोलीमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक कळंबोली-रोडपाली, सेक्टर १२ मधील म्हासर (म्हासोबा) तलावाकडे ठरलेल्या मार्गांनी मार्गस्थ होईल. यामध्ये करावली चौक, केएल-२ नाका, एसबीआय चौक, सनशाईन सोसायटी आणि बाल सोसायटीमार्गे जाणारा मुख्य मार्ग असणार आहे. तसेच सेक्टर २० मधील केतली चौक, पोलीस मुख्यालय चौक आणि हंसध्वनी गृहसंकुल मार्गे जाणारा दुसरा मार्ग असेल.


अत्यावश्यक सेवा वगळता विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील काही पट्ट्यांवर वाहनांना प्रवेश बंदी असेल. त्यामुळे वाहनचालकांनी आणि स्थानिकांनी आपल्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Navi Mumbai Traffic)

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी; 25 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यापक तयारी

Dhaktya Sunbai Serial: मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेचा शुभारंभ, कधी अन् कुठं पहायला मिळणार?

मुंबई: गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू होणारी प्रत्येक नवी सुरुवात खास असते. याच भावनेतून झी मराठीने आपल्या

Asian Games 2026 : सीमा कुमारीची ऐतिहासिक कामगिरी! महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीत पटकावले कांस्यपदक

नागोया (जपान) :जपानमधील नागोया येथ

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागांत 24 तास पाणीपुरवठा विस्कळीत, 7 दिवस कमी दाबाने पाणी

मुंबई : एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी तुर्भे निम्नस्तरीय जलाशय ते तुर्भे

Starbucks : स्टारबक्सचा मोठा निर्णय; उत्तर अमेरिकेतील 250 कॉफी शॉप्स बंद होणार

मुंबई : स्टारबक्स आपल्या स्टोअर नेटवर्कचा आढावा घेत असून, या प्रक्रियेअंतर्गत उत्तर अमेरिकेतील 250 कॉफी शॉप्स

Federal Bank FASTag : जुन्या फास्टॅगला रामराम न करता बँक बदलणे झाले सोपे! फेडरल बँकेकडून क्रांतिकारी 'वनटॅग' सुविधा सुरू

मुंबई : भारतातील डिजिटल वाहतूक व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल उचलत Federal Bank ने 'OneTag – FASTag Portability' ही नवीन