वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी जोरदार रस्सीखेच आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सहा संघांमध्ये चुरस आहे. तर तीन या संघ या स्पर्धेतून आऊट झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश, भारत आणि श्रीलंका या संघांना अंतिम फेरीची संधी आहे. पण भारत आणि श्रीलंकेचं गणित काठावर आहे. प्रत्येक सामना करो या मरोची लढाई असणार आहे. भारताची न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेत एखाद दुसरा सामना गमावला तर भारताचं गणित संपुष्टात येईल. असं असताना बांगलादेशचे फिरकी गोलंदाज प्रशिक्षक मुश्ताक अहमद यांच्या वक्तव्याने क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. बांगलादेश संघ 2025-2027 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळेल असं त्यांचं म्हणणं आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 च्या गुणतालिकेत बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे बांगलादेश संघालाही अंतिम फेरीत खेळण्याची संधी आहे. बांगलादेश संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली होती. त्यामुळे बांगलादेशचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, प्रशिक्षक मुश्ताक म्हणाले की, 'आम्ही सध्या चांगल्या स्थितीत आहोत. चांगलं क्रिकेट खेळून आम्ही पुढे जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय सामने तेव्हाच जिंकले जातात, जेव्हा तुम्ही हरण्याची चिंता करत नाही. आम्हाला आमची मानसिकता बदलण्याची गरज आहे. याचे श्रेय सर्व खेळाडू, निवड समिती आणि संबंधित घटकांना जाते. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आता कोणत्याही संघाला आव्हान देऊ शकतो.'
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामन्यात मॅथ्यू ब्रीट्झकेचा झंझावात पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि ...
..तर बांगलादेशचा संघ अंतिम फेरी गाठेल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत बांगलादेशला एकूण 4 सामने खेळायचे आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये बांगलादेशचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. घरच्या मैदानावर होणारे दोन्ही सामने बांगलादेशला 2-0 अशा फरकाने जिंकावेच लागतील. त्यानंतर बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2026 मध्ये होणारा हा परदेशातील दौरा अत्यंत कठीण असेल. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बांगलादेशला तिथे किमान 1 सामना जिंकावा लागेल किंवा ती मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवावी लागेल. असं झालं तर अंतिम फेरीत बांगलादेशचा संघ खेळेल.