Ganeshotsav 2026: गणेशभक्तांना दिलासा; विसर्जनाच्या दिवशी रात्रभर धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, रेल्वेचंही जाणून घ्या अपडेट

मुंबई: मुंबई मेट्रो 3 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी मुंबई मेट्रो लाईन 3 (Aqua Line)ची सेवा रात्रभर सुरू राहणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून जाहीर करण्यात आले आहे. गणपती बाप्पाच्या निरोपासाठी जाणाऱ्या भाविकांना या विशेष सेवेचा लाभ घेता येणार आहे. आरे ते कफ परेड मार्गावर धावणारी ही मेट्रो गणेशभक्तांच्या दृष्टीने फार महत्त्वाची ठरणार आहे. मेट्रो सेवेसोबतच रेल्वे मार्गिकेवरही विशेष सेवा भाविकांना पुरवली जाणार आहे.



एमएमआरसीने पूर्वी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गणेश भक्तांसाठी मेट्रो सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी एमएमआरसीने गणेश भक्तांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो लाईन 3 (Aqua Line)ची सेवा रात्रभर सुरू राहणार आहे. विसर्जनानंतर होणारी प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रोनंतर पश्चिम रेल्वेवरही विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. 25 सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट- विरार स्थानकादरम्यान 12 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.





चर्चगेट- विरार दरम्यान डाऊन मार्गावर विशेष लोकल मध्यरात्री 01.15 ते मध्यरात्री 03.45 वाजेपर्यंत धावणार आहे. तर विरार- चर्चगेट दरम्यान अप मार्गावर विशेष लोकल मध्यरात्री 12.15 ते पहाटे 3 या कालावधीत धावणार आहे. त्यामुळे विसर्जनानंतर रात्री घरी उशिरा येणाऱ्या भाविकांची प्रवासाबाबतीत गैरसोय होऊ नये, याकरिता विशेष लोकल चालवली जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गिकेवरही विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. मुंबई सीएसएमटी- कल्याण, मुंबई सीएसएमटी- ठाणे आणि मुंबई सीएसएमटी- पनवेल दरम्यान लोकल चालवल्या जाणार आहेत. यामुळे गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय टळणार आहे.


Comments
Add Comment

Navi Mumbai Accident: ट्रान्स हार्बर रेल्वे विस्कळीत, नवी मुंबईमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; वाचा अपडेट

नवी मुंबई: उरण- बेलापूर रेल्वे मार्गिकेवर मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गिका

दिशा सालियन प्रकरणातील पुरावे सीबीआयकडे सुपूर्द, वडील सतीश सालियन यांच्याकडून पेन ड्राइव्ह जमा; दोषींवर तातडीने कारवाईची मागणी

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित पुरावे असलेला पेन

Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त; 2000 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

नवी मुंबई: गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 1044

IIT Bombay Mid Sem Exam : आयआयटी मुंबईच्या मध्य-सत्र परीक्षा 10 आणि 11 ऑक्टोबरला; विद्यार्थी आंदोलनानंतर संस्थेचा मोठा निर्णय

मुंबई: आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी

MPCB new rules : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्करचनेत पुन्हा बदल

सांडपाण्याच्या प्रमाणानुसार वार्षिक शुल्क; सूक्ष्म, लघुउद्योगांसह बांधकाम, आरोग्य आस्थापना आणि जनरेटरसाठी नवी

Goregaon Fire : गोरेगावमध्ये 8व्या मजल्यावरील घराला आग; परिसरात खळबळ

एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई : मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात गुरुवारी सकाळी