Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवात परतीच्या प्रवासाची चिंता मिटली, मुंबई मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येकजण उत्सुक आहोत. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त रात्री सुद्धा गणरायाचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडत असतात. यासर्व गणेशभक्तांसाठी महामुंबई मेट्रोकडून विशेष सुविधा देण्यात येणार आहे. गणेशभक्तांना गणेशोत्सवाचा पुरेपूर आनंद घेता यावा, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सुविधा मिळावी, यासाठी एमएमआरडीएद्वारे गणेशोत्सवात मार्गिका २अ, ७, ९ आणि २ब वर रात्री १२.३० वा. पर्यंत विशेष अतिरिक्त सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.



खरंतर, मेट्रो मार्गिका २अ, ७, ९ आणि २ब वरून शेवटची लोकल रात्री ११ वाजता सुटते. पण आता गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये शेवटची मेट्रो मध्यरात्री १२.३० वाजता सुटणार आहे. तब्बल दीड तासांसाठी मेट्रोसेवा वाढवण्यात आली आहे. प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन गर्दीच्या वेळेमध्ये नियमित सेवांव्यतिरिक्त १० ते १५ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अंधेरी पश्चिम आणि दहिसर पूर्व (मार्गिका २अ), गुंदवली आणि काशीगाव (मार्गिका ७ व ९) तसेच महाराष्ट्र नगर-मंडाळे आणि चेंबूर (मार्गिका २ब) येथून शेवटची मेट्रो रात्री ११.०० वा. ऐवजी मध्यरात्री १२.३० वा. सुटणार आहे. त्यामुळे शेवटची मेट्रो सुटण्याची चिंता न करता गणेशभक्तांना रात्री उशिरापर्यंत गणेशोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.

कोणत्या मार्गिकेवर किती अतिरिक्त फेऱ्या?



  1. सोमवार ते शुक्रवार: मार्गिका २अ- २९९ फेऱ्या (+१०) | मार्गिका ७ आणि ९- २९० फेऱ्या (+१४)| मार्गिका २ब- १८० फेऱ्या (+१५)

  2. शनिवार: मार्गिका २अ- २४१ फेऱ्या (+१०)| मार्गिका ७ आणि ९- २३७ फेऱ्या (+१४)| मार्गिका २ब- १८० फेऱ्या (+१५)

  3. रविवार: मार्गिका २अ- २२३ फेऱ्या (+१०)| मार्गिका ७ आणि ९- २१९ फेऱ्या (+१४)| मार्गिका २ब- १८० फेऱ्या (+१५)




विशेष अतिरिक्त सुविधा आणि गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये करण्यात आलेल्या वाढीव फेऱ्यांमुळे, प्रवाशांना आपल्या आवडत्या गणेश मंडळापर्यंत आणि गणेशोत्सवाच्या स्थळी सुरक्षित, सुरळीत व विश्वासार्ह रात्रीच्या प्रवासाची सुविधा मिळणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महा मुंबई मेट्रोकडून गणेशभक्तांना मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्यांचं गिफ्ट मिळालं आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे महानगर पालिका प्रशासनाकडून आणि महा मुंबई मेट्रोकडून प्रवाशांना खासगी वाहतुकीचा वापर न करता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane Modi Express : मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून दुसरी 'मोदी एक्सप्रेस' उद्या रवाना होणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली दुसरी 'मोदी एक्सप्रेस' रविवारी

Mumbai Crime: बनावट मृत्यू प्रमाणपत्र अन्...... कोटींचा फ्लॅट विकला; मुंबईत बायकोचा धक्कादायक कारनामा!

मुंबई: 'मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं' ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल किंवा त्या म्हणीचा कोणाला बोलण्यासाठी सुद्धा

Mumbai Railway Megablock: प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक, गणेशोत्सवाची शॉपिंग करायला जाण्याआधी वाचा

मुंबई: रविवारी अर्थात उद्या घराबाहेर पडण्याआधी एकदा ही आवश्य बातमी वाचा. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या

Namo Express : ‘नमो एक्स्प्रेस’ आणि विशेष बसेसच्या माध्यमातून दीड हजारांहून अधिक भाविक कोकणाकडे रवाना

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाता यावे,

Swarved Mahamandir Bhiwandi : भिवंडीतील गणेशोत्सवात साकारणार वाराणसीच्या 'स्वरवेद महामंदिर धाम'ची १२० फूट उंच भव्य प्रतिकृती

मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रसिद्ध वाराणसी येथील 'स्वरवेद महामंदिर धाम'ची (Swarved Mahamandir Dham) सुमारे १२० फूट उंच आणि

Mumbai Ganpati 2026 : गणपती उत्सवापूर्वी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; सुरक्षिततेचा उपाय म्हणून मशीद आणि माटुंगा येथील चार पादचारी पूल बंद होणार

मुंबई: