वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेपूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर याने जियो हॉटस्टारशी संवाद साधला. गौतम गंभीरने सांगितलं की, इंग्लंड दौऱ्यात संजू सॅमसनला बसवून वैभव सूर्यवंशीला खेळवणं हा कोचिंग करिअरमधील सर्वात कठीण निर्णय होता. या निर्णयामुळे रात्रभर झोप लागली नाही. इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यानंतर संजू सॅमसनला बसवून वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली. पण हा निर्णय का घेतला? याबाबत सांगताना गौतम गंभीर म्हणाला की, वैभव सूर्यवंशी फॉर्मात होता आणि भारताला ही मालिका जिंकायची होती. पण संजू सॅमसन टी20 वर्ल्डकप स्पर्धेत प्लेयर ऑफ द टूर्नामेंट होता, त्यामुळे हा निर्णय घेताना कठीण गेलं. पण या निर्णयाबाबत प्रामाणिकपणे संजू सॅमसनशी चर्चा केली होती, असंही गंभीर पुढे म्हणाला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी जोरदार रस्सीखेच आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सहा संघांमध्ये चुरस आहे. तर तीन या संघ या ...
गौतम गंभीरने सांगितलं की, प्रशिक्षकाच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीतील ती सर्वात कठीण रात्र होती. मी रात्रभर झोपू शकलो नाही. मी याबाबत संजू सॅमसनला सांगितलं होतं. संजूने हा निर्णय समजून घेतला आणि निवांतपणे मान्यही केलं. ही चर्चा फक्त संजू आणि माझ्यात झाली होती. या मालिकेनंतर संजू सॅमसन भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळला. या मालिकेत वैभव सूर्यवंशी ऐवजी संजूला संधी दिली गेली. त्या संधीचं संजू सॅमसननं सोनं केलं आणि 2 अर्धशतकं ठोकली. इतकंच काय तर अफगाणिस्तानला क्लिन स्विप दिला.