Mushtaq Khan Dies: ‘वेलकम’फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन; वयाच्या 56 व्या वर्षी दुर्धर आजारामुळे निधन

मुंबई: बॉलिवूड सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते. मुश्ताक खान यांचे कॅन्सर आजारामुळे निधन झाले आहे. मुश्ताक खान यांच्या निधनाचे वृत्त काही वेळापूर्वी एएनआय न्यूज ने दिलेले आहे. गेल्या 15 दिवसांपासून मुश्ताक यांच्यावर मुंबईतल्या नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. पण उपचारा अंती आज (24 सप्टेंबर- गुरूवार) सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीला दिलेले आहेत. 'वेलकम', 'गदर', 'आशिकी', 'मुझसे शादी करोगी' आणि 'हम है राही प्यार के' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये मुश्ताक खान यांनी काम केले आहे.



मुश्ताक खान गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हरच्या कॅन्सरशी लढा देत होते. पण या गंभीर आजाराशी लढत असतानाच त्यांचं निधन झाले आहे. मुश्ताक खान यांच्या निधनामुळे अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुश्ताक यांच्यावर मुंबईतील विलेपार्लेतील नानावटी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. मुश्ताक यांचे जवळचे मित्र आणि विनोदी कलाकार सुनील पाल यांनी माध्यमांसोबत बोलताना त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, मुश्ताक यांच्यावर उद्या अर्थात, 25 सप्टेंबर गुरूवारी मुंबईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अद्याप त्यांच्या अंत्यविधीबद्दल पुढची अपडेट कळू शकलेली नाही.


 



मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहर या छोट्या गावात मुश्ताक यांचा जन्म झाला होता. मुश्ताक यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी मुंबई गाठली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणाचीही ओळख नसतानाही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मुश्ताक यांनी 1980 पासून बॉलिवूडमध्ये अभिनयाची सुरूवात केली. मुश्ताक खान यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये सहाय्यक भूमिका आणि विनोदी भूमिकांच्या माध्यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चाहत्यांमध्ये आपली छाप पाडली. ‘वेलकम’मधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 'गदर', 'आशिकी', 'मुझसे शादी करोगी' आणि 'हम है राही प्यार के' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांतून त्यांनी आपला ठसा उमटवला. मुश्ताक खान जरीही आज आपल्यामध्ये नसले तरीही ते कायमच आपल्या सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमांतून चाहत्यांमध्ये जिवंत राहतील, यामध्ये शंका नाही.

Comments
Add Comment

Ravi Prakash Marathi Debut : ‘साऊथ ते मराठी’ रवी प्रकाश यांची खाकी वर्दीत दमदार एन्ट्री; ‘दशमी’मध्ये साकारणार ACP आसिफ मुजावर

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध तेलगू अभिनेता रवी प्रकाश आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार

Dhaktya Sunbai Serial: मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेचा शुभारंभ, कधी अन् कुठं पहायला मिळणार?

मुंबई: गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू होणारी प्रत्येक नवी सुरुवात खास असते. याच भावनेतून झी मराठीने आपल्या

Bigg Boss Controversy : सलमान खानच्या ‘बिग बॉस’वर सुनील पालची बोचरी टीका! म्हणाला; ‘भाईजान, हा गटर शो आधी बंद करा!’

मुंबई : कॉमेडियन सुनील पाल आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का

Shak: Trust No One Review : मुलीच्या शोधात निघालेली एक जिद्दी आई! परिणीती चोप्राच्या थ्रिलरमध्ये उत्कंठा आणि सस्पेन्स; पण...

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) नेटफ्लिक्सवरील 'शक: ट्रस्ट नो वन' (Shaque: Trust No One) या नवीन मिस्ट्री-थ्रिलर

Ranbir Kapoor First Look in 'Love & War' : 'लव्ह अँड वॉर' चित्रपटामधून रणबीर कपूरचा रुबाबदार लूक समोर; आलिया भट्टसह विकी कौशलही झळकणार

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela bhansali) यांच्या बहुप्रतिक्षित 'लव्ह अँड वॉर' (Love and War) या चित्रपटाची

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ची डिजिटलवर मोठी झेप ! सलमान खानचं 'ते' वक्तव्य अन् 2 कोटी व्ह्युअर्सचा टप्पा पार

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन काही दिवसच झाले असले तरी या सीझनची चर्चा चांगलीच रंगली आहे. आता या चर्चेला डिजिटल