मुंबई : कॉमेडियन सुनील पाल आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने ट्रोलर्सना दिलेल्या प्रतिक्रियेवर सुनील पालने भाष्य करत सलमान खान आणि ‘बिग बॉस’ शोवर टीका केली आहे. ‘बिग बॉस’ हा “गटर शो” असून, तो बंद करण्याचा सल्लाही त्याने सलमानला दिला. (Bigg Boss Controversy)
माध्यमांशी बोलताना सुनील पालने ट्रोलिंगचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले. टीका करायची असेल तर ती योग्य पद्धतीने मांडली पाहिजे, असे त्याने म्हटले. मात्र, ‘बिग बॉस’मधील स्पर्धक आणि शोचा होस्टही ट्रोलिंगपासून मुक्त नसल्याचे त्याने सांगितले.
Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन काही दिवसच झाले असले तरी या सीझनची चर्चा चांगलीच रंगली आहे. आता या चर्चेला डिजिटल व्ह्युअरशिपच्या आकडेवारीचीही जोड मिळाली ...
‘बिग बॉस’ बंद करण्याचा सल्ला
सुनील पालने ‘बिग बॉस’वर समाजावर नकारात्मक परिणाम होत असल्याचा आरोप केला. त्याने सलमान खानला उद्देशून हा शो बंद करण्याचा सल्ला दिला. ‘बिग बॉस’ला त्याने ‘दुनियेतील सर्वात कलंकित शो’ असेही संबोधले. (Bigg Boss Controversy)
सलमानवर कास्टिंगबाबतही दावा
सुनील पालने ‘बिग बॉस’च्या कास्टिंगबाबतही काही दावे केले. शोमधील 80-90 टक्के कास्टिंग सलमान खान स्वतः करतो, असा दावा त्याने केला. मात्र, या दाव्याला त्याने कोणताही पुरावा दिलेला नाही. तसेच शोसाठी आपल्याशीही संपर्क साधण्यात आला होता, मात्र आपण त्यांच्यासमोर झुकलो नाही, असे सुनीलने सांगितले. (Bigg Boss Controversy)
मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्यावरून नवा वाद समोर आला आहे. कपोळ को- ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील त्याच्या मालमत्तेत ...
‘सलमानला आम्ही स्टार बनवलं’
सलमान खानच्या स्टारडमवर भाष्य करताना सुनील पालने “सलमानला आपण बनवलं आहे, सलमानने आपल्याला नाही”, असे म्हटले. प्रेक्षक, मीडिया आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे सलमान स्टार झाला असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, सुनील पालच्या या वक्तव्यांवर सलमान खान किंवा ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे त्याचे कास्टिंग आणि इतर दावे हे त्याचे वैयक्तिक दावे म्हणूनच पाहिले जात आहेत. (Bigg Boss Controversy)