बनावट कागदपत्रांद्वारे २५ मोबाईल कनेक्शन सक्रिय
दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये एका पॉइंट ऑफ सेल (PoS) एजंटने नागरिकांच्या संमतीशिवाय त्यांच्या ओळखपत्रांचा वापर करून २५ मोबाईल कनेक्शन्स बेकायदेशीररीत्या सक्रिय केल्याचे आढळले. या प्रकरणात संबंधित एजंटला ब्लॅकलिस्ट करण्यात आले. तसेच संशयास्पद मोबाईल क्रमांकांची पुनर्पडताळणी करून आवश्यकतेनुसार ते निष्क्रिय करण्यात आले आहेत.
TRAI New Rules 2026 : मोबाईल ग्राहकांसाठी TRAIचा मोठा निर्णय; आता डेटा नसलेले कॉलिंग आणि SMS रिचार्ज प्लॅन मिळणार!
मुंबई : मोबाईल ग्राहकांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘टेलिकॉम ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) नियम, २०२६’ ...
सिमकार्ड आणि मोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी?
नागरिकांनी आपल्या नावावर जारी केलेले सिमकार्ड इतरांना देणे किंवा हस्तांतरित करणे टाळावे. बनावट कागदपत्रे किंवा दुसऱ्या व्यक्तीची ओळख वापरून सिमकार्ड मिळवू नये. तसेच छेडछाड केलेले IMEI क्रमांक असलेली उपकरणे आणि बदल करता येणारे SIM Box वापरू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. (SIM Card Fraud) याशिवाय, Calling Line Identity (CLI) किंवा इतर दूरसंचार ओळख क्रमांकांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत. सायबर फसवणूक किंवा अन्य बेकायदेशीर कृत्यांसाठी सिमकार्ड उधार देणे अथवा भाड्याने देणेही टाळावे.
Maharashtra Government : दिव्यांग पाल्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची तीन वर्षांची अट रद्द
- कायमस्वरूपी अपंगत्वासाठी प्रमाणपत्र एकदाच; तात्पुरत्या अपंगत्वासाठी पाच वर्षांनी प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी ...
‘संचार साथी’ पोर्टलद्वारे करा मोबाईल कनेक्शनची पडताळणी
नागरिकांना त्यांच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन्स जारी करण्यात आली आहेत, याची माहिती ‘संचार साथी’ पोर्टल आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून तपासता येते. आपल्या परवानगीशिवाय जारी केलेले किंवा वापरात नसलेले कनेक्शन आढळल्यास त्याची तक्रार नोंदवून ते ब्लॉक करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. (SIM Card Fraud) या प्लॅटफॉर्मवर मोबाईल हँडसेटच्या IMEI क्रमांकाची सत्यता पडताळता येते. त्याद्वारे उपकरणाचा ब्रँड, मॉडेल आणि उत्पादक यांसारखी माहिती तपासता येते.
72th National Film Award: कार्तिक आर्यन, यामी गौतम अन्...! 'मु. पो. बोंबिलवाडी' ठरला राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी! अशी आहे यादी
मुंबई: संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीचं ज्या पुरस्कार सोहळ्याकडे लक्ष असतं, ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. 72 वर्षांमध्ये ...





