मॅथ्यू ब्रीट्झकेने आतापर्यंत खेळलेल्या 14 वनडे डावात 822 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे वनडे क्रिकेटमधील हा विक्रम आहे. फक्त 14 वनडे डावात 800हून अधिका धावा करणारा मॅथ्यू ब्रीट्झके हा एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याने या खेळीसह 769 धावा करणाऱ्या इमाम उल हकचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये आपली छाप अल्पावधीतच सोडली आहे. पाकिस्तानमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 77, ऑस्ट्रेलियामध्ये 72.50 आणि इंग्लंडमध्ये 44.5 आहे. भारतातील त्याची एकदिवसीय सरासरी 54.6 असून, दक्षिण आफ्रिकेत त्याची सरासरी 112 पेक्षा जास्त आहे. मॅथ्यू ब्रीट्झकेने आपल्या पहिल्या 14 एकदिवसीय डावांमध्ये तब्बल आठ वेळा 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला.त्याने भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
A Century To Remember. 💯🇿🇦
Relive Matthew Breetzke’s magnificent 112 for #TheProteas. 👏🏏
One for the highlight reel.#Unbreakable pic.twitter.com/3ToSDwP1ti
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 24, 2026
वुमन्स प्रीमियर 2027 स्पर्धेसाठी पाचही फ्रेंचायझी सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी संघांची बांधणी सुरू असून प्रशिक्षक स्टाफ बदलाचे वारे वाहू लागले आहे. असं ...
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ तीन वेळा 100हून अधिक धावांची भागीदारी रचली आहे. यामध्ये एबी डिविलियर्स व शॉन पोलॉक (119 धावा, क्वेबेरा, 2006), डेव्हिड मिलर व अँडिल फेहलुकवायो (नाबाद 107 धावा, डर्बन, 2016) आणि मॅथ्यू ब्रीट्जके व मार्को यानसेन (107 धावा, डर्बन, 2026) यांचा समावेश आहे.