विराट कोहली 15 हजारांचा टप्पा गाठणार
विराट कोहली क्रिकेट जगतात नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 59 धावांची गरज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केल्यास, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर वनडे क्रिकेटमध्ये 15 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरेल.
विराट कोहलीने आपल्या 314 वनडे सामन्यांच्या कारकिर्दीत 15,903 चेंडूंचा सामना करत 14,941 धावा कुटल्या आहेत. यादरम्यान तो 47 वेळा नॉट आऊट राहिला असून 18 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर 54 शतके आणि 79 अर्धशतके ठोकली असून यामध्ये 1,389 चौकार आणि 172 षटकारांचा समावेश आहे.
एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जापानमध्ये आहे. वैभव सूर्यवंशीही एशियन गेम्स स्पर्धा खेळण्यासाठी जापानमध्ये ...
रोहित शर्माला '12 हजारी' क्लबचे वेध
रोहित शर्मादेखील एका मोठ्या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12,000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आता केवळ 105 धावांची आवश्यकता आहे. रोहित शर्माने आतापर्यंत खेळलेल्या 288 वनडे सामन्यांमध्ये 12,784 चेंडूंचा सामना करत 11,895 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा आपल्या कारकिर्दीत 37 वेळा नॉट आऊट राहिलेला रोहित 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 34 शतके, 62 अर्धशतके आणि तब्बल 3 द्विशतके ठोकण्याचा अनोखा विश्वविक्रम केला असून त्याच्या नावावर 1,125 चौकार आणि 369 षटकार नोंदवले गेले आहेत. 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या पहिल्या सामन्यात हे दोन्ही फलंदाज नवा इतिहास रचणार का, याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.