पुणे : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक घराबाहेर पडणार आहेत. यामुळे मेट्रो स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष नियोजन केले आहे. शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील 6 महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या गेटमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच गणेश विसर्जनासाठी रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रो सेवा सलग 41 तास सुरू ठेवण्यात येणार आहे.
मुंबई: गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू होणारी प्रत्येक नवी सुरुवात खास असते. याच भावनेतून झी मराठीने आपल्या आगामी ‘धाकट्या सुनबाई’ या नव्या ...
गर्दीमुळे प्रवाशांना अडचण होऊ नये आणि स्थानकांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी काही स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे गेट निश्चित करण्यात आले आहेत. पीसीएमसी स्थानकावर फिनोलेक्स चौकाच्या बाजूने गेट क्रमांक 1 आणि 4 मधून प्रवेश, तर पीसीएमसी भवनच्या बाजूने गेट क्रमांक 2 आणि 3 मधून बाहेर पडता येईल.
डेक्कन जिमखाना स्थानकावर वनाजच्या बाजूचे गेट क्रमांक 1 प्रवेशासाठी, तर रामवाडीच्या बाजूचे गेट क्रमांक 2 आणि 3 बाहेर पडण्यासाठी असतील. छत्रपती संभाजी उद्यान स्थानकावर वनाजच्या बाजूचे गेट क्रमांक 1, 3 आणि 4 प्रवेशासाठी, तर रामवाडीच्या बाजूचे गेट क्रमांक 2 बाहेर पडण्यासाठी वापरावे लागेल.
एसएनडीटी स्थानकावर गेट क्रमांक 1 आणि 4 मधून प्रवेश, तर गेट क्रमांक 2 मधून बाहेर पडता येईल. गरवारे कॉलेज स्थानकावर गेट क्रमांक 1 आणि 4 प्रवेशासाठी आणि गेट क्रमांक 3 बाहेर पडण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. सिव्हिल कोर्ट/पीएमसी स्थानकावर रामवाडीच्या बाजूचे गेट क्रमांक 3 प्रवेशासाठी, तर वनाजच्या बाजूचे गेट क्रमांक 1 बाहेर पडण्यासाठी असेल.
हे बदल 25 सप्टेंबर रोजी दिवसभर लागू राहणार आहेत. शनिवारी 26 सप्टेंबरपासून सर्व स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था पूर्ववत करण्यात येणार आहे. प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी आपल्या प्रवासाच्या दिशेनुसार योग्य गेटचा वापर करावा, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे.