मुंबई : पवई आयआयटीमधील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आज, शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी पवई आयआयटीला भेट देणार आहेत. साहिल वाकोडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
दिवंगत विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी आयआयटी प्रशासनातील प्रमुख संचालक अधिकाऱ्यांची भेट घेऊन ना. रामदास आठवले या प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पवई आयआयटीमध्ये यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्याचा उल्लेख करत, अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आल्याचे म्हटले आहे.
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आज, 25 सप्टेंबर रोजी मुंबईत गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मुंबईतील प्रसिद्ध ...
आयआयटी सारख्या उच्च शिक्षण संस्थेत दलित विद्यार्थ्याच्या होणाऱ्या वारंवार आत्महत्या अत्यंत दुःखद गंभीर संतापजनक बाब असून उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीरपणे हाताळण्याची गरज असल्याचेही रिपब्लिकन पक्षाने म्हटले आहे. साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येप्रकरणी पक्षाने निषेध व्यक्त केला असून, या पार्श्वभूमीवर आठवले यांच्या पवई आयआयटी भेटीकडे लक्ष लागले आहे.






