या घटनेनंतर विद्यार्थी संघटनेने प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसशी संबंधित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) कडून प्राध्यापकांनी विद्यार्थ्याची माफी मागावी आणि विद्यापीठाने या घटनेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. NSUI चे राज्य उपाध्यक्ष वेदांत तोमर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिल्याचे 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी विद्यार्थ्याने कार्यक्रमादरम्यान शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी प्राध्यापकांनी विद्यार्थ्याशी अशा पद्धतीने वागणे योग्य आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी विद्यापीठाकडून अधिकृतपणे काय भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. ..Nirma University professor snatched students collar and threatened a student on a mere light joke in front of the whole event and even the comedian Rajat Sood.#ahmedabad pic.twitter.com/uEZ0iqJtOb
— Manan Trivedi (@itsurbunny7) September 24, 2026






