वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेला 27 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून जोरदार सराव सुरू आहे. या सामन्याता सर्वांच्या पुन्हा एकदा विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कामगिरीकडे लागून आहे. कारण या मालिकेतील कामगिरीवरून पुन्हा एकदा आकलन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी या दोन्ही खेळाडूंचा फॉर्म महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, या मालिकेपूर्वी विराट कोहलीच्या चाहत्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे. विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागच्या दोन वनडे मालिकांमध्ये फेल गेला होता. आता पुन्हा तसंच झालं तर सुमार कामगिरीची हॅटट्रीक होईल. मागच्या दोन वनडे मालिकेतील कामगिरी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहलीची बॅट शांत?
विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 2022 मध्ये वनडे मालिका खेळली होती. तेव्हा तीन सामन्यातील तीन डावात फक्त 26 धावा करू शकला होता. तेव्हा विराट कोहलीची सरासरी फक्त 8.66 इतकी होती. तर 2019 मध्ये पार पडलेल्या वनडे मालिकेतील तीन सामन्यात त्याने फक्त 89 धावा केल्या होता. तेव्हा विराट कोहलीची सरासरी 29.6 होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सहा सामन्यात विराट कोहलीची कामगिरी काही खास राहिली नाही. त्यामुळे विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी वेस्ट इंडिज मालिका वाईट स्वप्नासारखं आहे. आता विराट कोहली सुमार कामगिरीची हॅटट्रीक करतो की त्यावर मात करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
"लोक तुझा तिरस्कार करतील..." वीरेंद्र सेहवाग आपल्याच मुलाला असं का म्हणाला? नेमकं काय झालं?
वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा विषय आहे. भारतासाठी अंडर 19 संघात त्याची निवड झाली असून वनडे मालिका खेळाल. त्याने ...
विराट कोहली जबरदस्त फॉर्मात
विराट कोहली यावर्षी शेवटची वनडे मालिका इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तेव्हा त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. विराट कोहलीने कार्डिफमध्ये 65 आणि लॉर्ड्सवर 74 धावांची खेळी केली होती. त्यामुळे विराट कोहली फॉर्मात हे स्पष्ट दिसत आहे. विराट कोहली फॉर्मात असला की काय होतं हे सांगायला नको. त्याने मागच्या सहा सामन्यात 64 च्या सरासरीने 384 धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकं ठोकली आहेत. त्यामुळे विराट कोहली मागच्या दोन वनडे मालिकेत हिशेब चुकता करेल असंच दिसत आहे.