Friday, September 25, 2026

"लोक तुझा तिरस्कार करतील..." वीरेंद्र सेहवाग आपल्याच मुलाला असं का म्हणाला? नेमकं काय झालं?

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा विषय आहे. भारतासाठी अंडर 19 संघात त्याची निवड झाली असून वनडे मालिका खेळाल. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 109 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्यात वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक शैलीची झलक दिसत असल्याची प्रतिक्रिया क्रीडा जगतात उमटल्या आहे. अनेकांनी त्याच्या आक्रमक फलंदाजीचं कौतुक केलं आहे. असं असताना वडील या नात्याने वीरेंद्र सेहवागने मुलगा आर्यवीर याला सल्ला दिला आहे. सेहवागने सांगितलं की, या मालिकेपूर्वीच मी आर्यवीरल एक सल्ला दिला होता. त्याला सांगितलं होतं की बिनधास्तपणे खेळ.. मोठ्या धावसंख्येची चिंता अजिबात करू नको. इतकंच काय तर त्याला सांगितलं होत की, लोकं तुझ्यावर प्रेम करतील आणि तुझा तिरस्कारही करतील. लोकांच्या या गोष्टींवर कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही.

वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?

वीरेंद्र सेहवागने एका मुलाखतीत सांगितलं की, 'मला आर्यवीर सेहवागचा अभिमान वाटतो. मी त्याला स्पष्ट सांगितलं आहे की दबाव तर असतोच, पण मैदानावर निर्भयपणे खेळ. मोठी धावसंख्या उभारण्याची चिंता करू नको. जर तू निर्भयपणे खेळला तर मोठी धावसंख्या आपोआप होईल. जर तू मोठ्या धावसंख्येबाबत विचार करत राहिला तर मला नाही वाटत की मोठी धावसंख्या होईल.' वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला की, 'मी आर्यवीर सांगितलं आहे की, लोकं तुझ्यावर प्रेम करतील, लोकं तुझ्यावर टीका करतील, तुझा तिरस्कार करतील, पण त्यावर कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही. तू जे काही करत आहेस त्यावर खूश राहायचं.'
वीरेंद्र सेहवागने आर्यवीरला सांगितलं की, 'जर तू धावा केल्या तर तर समजून जायचं की तू चांगली कामगिरी केली आहे. जर तू चांगल्या धावा करू शकला नाहीस तर समजून जायचं की चांगली कामगिरी करत नाहीस. त्यामुळे लोकं काय म्हणतात याचा विचार करण्यापेक्षा आपल्या सरावावर लक्ष केंद्रीत करात. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते म्हणू दे. तू तुझ्या खेळावर लक्ष केंद्रीत कर.'

आर्यवीर सेहवागची कामगिरी

आर्यवीर सेहवागची अंडर 19 भारतीय संघात निवड झाली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यात 109 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 100 हून अधिक होता. पण दुर्दैवाने त्याला अर्धशतकी कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या सामन्यात 47 धावांवर असताना बाद झाला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >