वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
वीरेंद्र सेहवागने एका मुलाखतीत सांगितलं की, 'मला आर्यवीर सेहवागचा अभिमान वाटतो. मी त्याला स्पष्ट सांगितलं आहे की दबाव तर असतोच, पण मैदानावर निर्भयपणे खेळ. मोठी धावसंख्या उभारण्याची चिंता करू नको. जर तू निर्भयपणे खेळला तर मोठी धावसंख्या आपोआप होईल. जर तू मोठ्या धावसंख्येबाबत विचार करत राहिला तर मला नाही वाटत की मोठी धावसंख्या होईल.' वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला की, 'मी आर्यवीर सांगितलं आहे की, लोकं तुझ्यावर प्रेम करतील, लोकं तुझ्यावर टीका करतील, तुझा तिरस्कार करतील, पण त्यावर कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही. तू जे काही करत आहेस त्यावर खूश राहायचं.'
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकदा मैदानात पाहण्याची संधी त्याचे चाहते ...
वीरेंद्र सेहवागने आर्यवीरला सांगितलं की, 'जर तू धावा केल्या तर तर समजून जायचं की तू चांगली कामगिरी केली आहे. जर तू चांगल्या धावा करू शकला नाहीस तर समजून जायचं की चांगली कामगिरी करत नाहीस. त्यामुळे लोकं काय म्हणतात याचा विचार करण्यापेक्षा आपल्या सरावावर लक्ष केंद्रीत करात. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते म्हणू दे. तू तुझ्या खेळावर लक्ष केंद्रीत कर.'
आर्यवीर सेहवागची कामगिरी
आर्यवीर सेहवागची अंडर 19 भारतीय संघात निवड झाली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यात 109 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 100 हून अधिक होता. पण दुर्दैवाने त्याला अर्धशतकी कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या सामन्यात 47 धावांवर असताना बाद झाला.