यशस्वी जयस्वाल श्रीलंकन खेळाडूला का नडला? ध्रुव जुरेलने बाहेर काढला जुना किस्सा

भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केलं. पण दुसऱ्या सामन्यात विजय काही मिळवता आला नाही आणि सामना ड्रॉ झाला. त्यामुळे ही मालिका भारताने 1-0 ने आपल्या खिशात घातली. पण या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात झालेला वाद चर्चेत राहिला. कारण यशस्वी जयस्वाल हेल्मेट घातलं असताना त्यानेच असिथाच्या डोक्यावर टक्कर देणार होता. पण इतर खेळाडूंच्या मध्यस्थीमुळे वाद शमला. असं असताना दोन्ही खेळाडूंच्या सामना फीमधून 25 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली. पण तेव्हा नेमकं काय झालं होतं हे कोणालाच माहिती नव्हतं. आता याबाबतचा खुलासा ध्रुव जुरेलने केला आहे. ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल चांगले मित्र आहे आणि आयपीएलमध्ये एकाच फ्रेंचायझीकडून खेळतात.

ध्रुव जुरेलने सांगितलं काय घडलं ते?


आकाश चोप्रासोबत झालेल्या चर्चेत ध्रुव जुरेलने यशस्वी जयस्वाल का संतापला? याबाबत सांगितलं. ध्रुव जुरेलने सांगितलं की, जेव्हा यशस्वी जयस्वाल बाद झाला तेव्हा ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता. तेव्हा श्रीलंकन खेळाडू त्याला शिव्या देत होते. हा वाद कोलंबो कसोटीच्या पहिल्याच दिवशी झाला होता. फर्नांडोने यशस्वी जयस्वालची विकेट काढली आणि बाद झाल्यानंतर तो तंबूत जात होता तेव्हा गोलंदाजाकडे वळला. जयस्वालचा पारा चढला होता आणि त्याने हेल्मेट घातलेल्या डोक्यानेच टक्कर मारणार होता. पण या दोघांना इतर खेळाडूंनी कसं बसं वेगळं केलं.







ध्रुव जुरेलने सांगितलं की, 'तुम्ही व्हिडीओ पाहिला तर यशस्वी जयस्वाल अचानक पाठी वळला. तो तंबूत जात होता. पण श्रीलंकन खेळाडूंकडून अपशब्द बोलले जात होते. जयस्वालने मला सांगितलं की श्रीलंक खेळाडू वारंवार शिव्या देत होते.' जुरेलने या घटनेचा संदर्भ घेत जयस्वालने पुढे काय झालं ते सांगितलं. जसस्वालने श्रीलंकन खेळाडूला सांगितलं की, 'बरं, तू मला आऊट केलं. तू सामान्य स्थितीत आक्रमकता दाखव ना.. पण शिव्या देऊ शकत नाही.' यशस्वी जयस्वालने स्वत:हून काही वाद घातला नाही. त्याला डिवचल्याने तसं केल्याचं ध्रुव जुरेलने सांगितलं.
Comments
Add Comment

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाचा दिमाखदार पराक्रम; जपानचा 3-1 ने धुव्वा उडवत गाठली उपांत्य फेरी!

गिफू : आशियाई खेळ 2026 मधील भारतीय महिला हॉकी संघाने उत्कृष्ट आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत नवा इतिहास रचला आहे.

किंग कोहली अडचणीत? वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात होऊ शकतो हा मोठा अनर्थ!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेला 27 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून

"लोक तुझा तिरस्कार करतील..." वीरेंद्र सेहवाग आपल्याच मुलाला असं का म्हणाला? नेमकं काय झालं?

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा विषय आहे. भारतासाठी अंडर 19 संघात त्याची निवड झाली

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित-विराट रचणार विक्रम, हा रेकॉर्ड रडारवर

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा

Asian Games 2026 : सीमा कुमारीची ऐतिहासिक कामगिरी! महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीत पटकावले कांस्यपदक

नागोया (जपान) :जपानमधील नागोया येथ

वैभव सूर्यवंशीने उडवली होती गौतम गंभीरची झोप, रात्रभर विचारात गुंतला! नेमकं काय घडलं होतं?

एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जापानमध्ये आहे. वैभव सूर्यवंशीही एशियन गेम्स