Sunita Ahuja : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा सुरू आहेत. आता पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. गोविंदाचे नाव त्याच्या आगामी ‘रूपा’ चित्रपटातील अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत जोडले जात असल्याच्या चर्चांवर सुनीता आहुजाने प्रतिक्रिया दिली आहे. कोलकाता येथील प्रसिद्ध दक्षिणेश्वर काली मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुनीता यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी काली मातेची प्रार्थना केल्याचे सांगितले.
‘माझ्या आयुष्यातील संकटांचा नाश व्हावा’
काली मातेच्या दर्शनानंतर सुनीता भावुक झाल्याची पाहायला मिळाली. ती म्हणाली, "ज्याप्रमाणे माता काली असुरांचा वध करते, तसेच सध्या माझ्याही आयुष्यात काही राक्षस शिरले आहेत. मी मातेच्या चरणी प्रार्थना करायला आले आहे की, तिने माझ्या आयुष्यातील या सर्व संकटांचा आणि राक्षसांचा लवकरात लवकर नाश करावा. माझ्या मार्गात आलेले हे काटे दूर व्हावेत आणि मला या त्रासातून मुक्ती मिळावी, हेच साकडं मी घातलं आहे."
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम धर हिची मुख्य भूमिका असलेल्या 'नयी नवेली' या आगामी फँटसी फॅमिली एंटरटेनर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड ...
‘प्रत्येक महिलेने माझ्या पाठीशी उभं राहावं’
सुनीता यांनी यावेळी तरुण पिढी आणि महिलांना भावनिक आवाहनही केले. त्यांच्या मते, सध्या सुरू असलेल्या काही चर्चा या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केल्या जात असल्याचा त्यांचा दावा आहे. आपल्यासोबत जे काही घडत आहे ते अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी महिलांनी आपल्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले.
गोविंदा-कोमल राणीच्या चर्चेवरून वाद
गोविंदा यांच्या आगामी ‘रूपा’ चित्रपटामुळे अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गोविंदा आणि कोमल राणी यांच्यातील संबंधांबाबत विविध चर्चा सोशल मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात सुरू आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गोविंदा आणि कोमल राणी एकत्र दिसले होते. यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले. गोविंदाने माध्यमांशी बोलताना कोमल राणीसोबतचे संबंध हे व्यावसायिक असल्याचे स्पष्ट केले होते. यापूर्वीही आपण करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यासोबत मंदिरात गेल्याचा संदर्भ देत त्याने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती.
बॉलिवूड अभिनेता आणि फिल्म निर्माता यशपाल शर्मा यांचा सख्खा भाऊ राजेश कुमार याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना हरियाणा लाचलुचपत प्रतिबंधक ...
यापूर्वीही चर्चेत आले होते वैवाहिक नाते
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्याबाबत यापूर्वीही चर्चा झाल्या आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये सुनीता यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये दोघांमध्ये समेट झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.आता गोविंदा आणि कोमल राणी यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान सुनीता यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या नात्याची चर्चा सुरू झाली आहे.