नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या महिला नेमबाजांनी पुन्हा एकदा तिरंगा फडकवला आहे. महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतीय संघाने अत्यंत अटीतटीच्या लढतीत रौप्य पदक पटकावले आहे. चीनने या प्रकारात सुवर्णपदक आपल्या नावावर केले, तर भारतीय मुलींच्या अचूक निशाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिलोत्तमा सेन, विदर्सा के. विनोद आणि आशी चौकसे या प्रतिभावान त्रिकुटाने या सांघिक प्रकारात एकूण 1763-90x अशी दमदार एकत्रित गुणसंख्या नोंदवली. या तिघींच्या चमकदार कामगिरीमुळे भारताला दुसरे स्थान मिळवणे शक्य झाले. या सांघिक प्रकारात तिलोत्तमा सेन हिने सर्वाधिक 590 गुण मिळवत संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. तिच्यापाठोपाठ विदर्सा के. विनोद हिने 588 गुण, तर आशी चौकसे हिने 585 गुणांची कमाई केली.
मुंबई : लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी रविवारी गिरगाव चौपाटीवर जनसागर लोटला असून, नवसाला पावणार्या लाडक्या गणरायाची ऐतिहासिक मिरवणूक ...
वैयक्तिक फेरीतही भारतीय खेळाडूंची चमक
फक्त सांघिक प्रकारच नव्हे, तर वैयक्तिक पात्रता फेरीतही भारतीय नेमबाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. तिलोत्तमा सेन आणि विदर्सा के. विनोद यांनी अनुक्रमे तिसरे आणि सहावे स्थान पटकावत थेट अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.(Indian Women Shooters)
तिलोत्तमा सेन: तिने गुडघ्यावर बसून (नीलिंग) 197, पोटावर झोपून (प्रोन) 199 आणि उभे राहून (स्टँडिंग) 196 असे एकूण 590 गुण मिळवले.
विदर्सा के. विनोद: खराब सुरुवातीनंतर जोरदार कमबॅक करत तिने 'प्रोन'मध्ये 199 आणि 'स्टँडिंग'मध्ये 196 गुणांसह एकूण 588 गुण घेत अंतिम फेरीत धडक मारली.
दुसरीकडे, आशी चौकसे हिने 585 गुण मिळवले, परंतु ती वैयक्तिक अंतिम फेरीतील प्रवेश अवघ्या काही गुणांनी हुकल्यामुळे मागे पडली.
50 मीटर रायफल 3 पोझिशन्सच्या या अतिशय आव्हानात्मक खेळात 'नीलिंग', 'प्रोन' आणि 'स्टँडिंग' अशा तीनही टप्प्यांवर भारतीय खेळाडूंनी दाखवलेले सातत्य देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. या शानदार यशाबद्दल संपूर्ण देशातून भारतीय महिला नेमबाजांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.(Indian Women Shooters)






