The Paradise Box Office : नानीच्या ‘द पॅराडाईज’ची बॉक्स ऑफिसवर घसरण; 2 दिवसांतच कमाईचा वेग मंदावला

नानी अभिनीत ‘द पॅराडाईज’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट झाली आहे. बुधवारी झालेल्या पेड प्रिव्ह्यूमध्ये चित्रपटाने 11.60 कोटी रुपये निव्वळ कमाई केली होती. त्यानंतर गुरुवारी प्रदर्शित झालेल्या पहिल्या दिवशी भारतात 34.65 कोटी रुपये निव्वळ कमाई केली. (The Paradise Box Office)

मुंबई : नानी अभिनीत ‘द पॅराडाईज’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट झाली आहे. बुधवारी झालेल्या पेड प्रिव्ह्यूमध्ये चित्रपटाने 11.60 कोटी रुपये निव्वळ कमाई केली होती. त्यानंतर गुरुवारी प्रदर्शित झालेल्या पहिल्या दिवशी भारतात 34.65 कोटी रुपये निव्वळ कमाई केली. (The Paradise Box Office)


मात्र शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी ‘द पॅराडाईज’ने भारतात 14.90 कोटी रुपये निव्वळ कमाई केल्याचे प्राथमिक आकडे आहेत. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या संमिश्र प्रतिक्रियांचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाल्याचे मानले जात आहे.


prahaar.in/2026/09/26/raghubir-yadav-explains-why-panchayat-movie-may-not-work-like-mirzapur/


आता सर्वांचे लक्ष शनिवारच्या कमाईकडे लागले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, शनिवारी चित्रपटाची कमाई 12 ते 14 कोटी रुपये राहू शकते. असे झाल्यास भारतातील चित्रपटाची एकूण निव्वळ कमाई 73 ते 75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र, रात्रीच्या शोला प्रेक्षकांची गर्दी वाढल्यास कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (The Paradise Box Office)



जगभरातील कमाई 97.50 कोटींवर


सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘द पॅराडाईज’ने परदेशात आतापर्यंत 25 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 97.50 कोटी रुपये झाली आहे. (The Paradise Box Office)


मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट सुमारे 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीकडे लक्ष लागले आहे. (The Paradise Box Office)







समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद


‘द पॅराडाईज’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. फ्री प्रेस जर्नलच्या समीक्षकाने चित्रपटाला 1.5 स्टार दिले आहेत. चित्रपटातील नानीचा अभिनय आणि दृश्यात्मक मांडणीचे कौतुक करण्यात आले असले, तरी कथानक आणि ॲक्शनबाबत काही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.


या संमिश्र प्रतिक्रियांचा परिणाम चित्रपटाच्या पुढील दिवसांच्या बॉक्स ऑफिस कमाईवर कितपत होतो, हे शनिवार आणि रविवारच्या कलेक्शननंतर स्पष्ट होणार आहे.(The Paradise Box Office)


Comments
Add Comment

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ‘ही’ 4 गाणी वाजणार नाहीत? बाल संरक्षण अधिकाऱ्यांचे पत्र

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईव्ह

Maharashtra Film Tourism: महाराष्ट्रात चित्रपट पर्यटनाला मिळणार नवी झळाळी! पर्यटन विभाग आणि चित्रनगरीत 5 वर्षांचा करार

मुंबई: पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात महाराष्ट्राला चित्रपट

Family Kirana Store TVF : टीव्हीएफच्या ‘फॅमिली किराणा स्टोअर’चा नवा विक्रम; अवघ्या १० महिन्यांत यूट्यूबवर तीन सीझन प्रदर्शित

गज्जू भैयांच्या (Gajju Bhaiya) किराणा दुकानाचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होण्यासाठी सज्ज झाले आहेत! द

Moushumi Chatterjee: मौसमी चॅटर्जींवर कोसळला दु:खाचा डोंगर, ज्येष्ठ अभिनेत्रीच्या पतीचे निधन

हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

TV Serial Ramayana : रामायण मालिकेतील रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी यांना कशी मिळाली ? 100 कलाकारांच्या ऑडिशननंतर रामानंद सागर यांनी घेतला होता मोठा निर्णय

TV Serial Ramayana Throwback : भारतीय मनोरंजनविश्वात ‘रामायण’ या मालिकेचे स्थान आजही अढळ आहे. रामानंद सागर यांच्या या लोकप्रिय

Big Boss 20: 'कैरेक्टर ढीला..तेरी पैंट में नाड़ा नहीं', लव्ह आणि स्काऊट मध्ये जोरदार वाद; बिग बॉस मध्ये मोठा राडा

Big Boss 20: बिग बॉस 20 च्या घरात 'कैरेक्टर ढीला' या गाण्यावरून लव्ह गिल आणि स्काऊट ओपी (Scout OP) यांच्यात जोरदार वाद रंगला.