Friday, September 25, 2026

Asian Games 2026 : सावन बरवालची ऐतिहासिक भरारी; मॅरेथॉनमध्ये तब्बल 44 वर्षांनंतर भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

Asian Games 2026 : सावन बरवालची ऐतिहासिक भरारी; मॅरेथॉनमध्ये तब्बल 44 वर्षांनंतर भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील भारताची ऍथलेटिक्स मोहीम अत्यंत सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. भारताचा प्रतिभावान धावपटू सावन बरवाल याने पुरुषांच्या मॅरेथॉन प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत रौप्यपदक (Silver medal) पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉन क्रीडा प्रकारातील भारताची तब्बल 44 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. यापूर्वी भारताला या कठीण प्रकारात 1982 च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळाले होते.

नागोया येथे पार पडलेल्या या अत्यंत अटीतटीच्या शर्यतीत सावन बरवाल याने 2 तास 11 मिनिटे 37  सेकंद अशी उत्कृष्ट वेळ नोंदवत स्वतःचा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. शर्यतीमध्ये जपानच्या इचिताका यामाशिता याने 2 तास 10 मिनिटे आणि 49 सेकंद वेळ देत सुवर्णपदक (Gold medal) जिंकले, तर चीनच्या फेंग पीयू याने कांस्यपदक (Bronze medal) मिळवले. बरवाल याने सुरुवातीपासूनच आपल्या उत्कृष्ट वेगावर नियंत्रण राखत शेवटपर्यंत स्पर्धेत चुरस कायम ठेवली. त्याच्या या ऐतिहासिक यशाने संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली आहे. (Sawan Barwal Asian Games)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >