Friday, September 25, 2026

संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मधील आलिया भट्टचा रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल!

संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मधील आलिया भट्टचा रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल!

मुंबई: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित 'लव्ह अँड वॉर' (Love & War) या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. रणबीर कपूरच्या दणदणीत फर्स्ट लूकनंतर आता चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्टचे दोन नवीन पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. या मनमोहक आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये आलिया भट्ट एका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिने डोक्यावर एक स्टायलिश हेडपीस आणि आकर्षक 'स्लिट स्कर्ट' परिधान केला आहे. रेट्रो-स्टाईल पार्श्वभूमीवर तिची आत्मविश्वासपूर्ण मुद्रा, कॅबरे-शैलीतील ग्लॅमर आणि जुन्या काळातील मोहकता (ओल्ड-स्कूल चार्म) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आलियाचा हा अवतार तिच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि राजेशाही थाटाचा आहे. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >