Saturday, September 26, 2026

Prabhadevi Accident : प्रभादेवीत मोठी दुर्घटना! विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; नेमकं काय घडलं?

Prabhadevi Accident : प्रभादेवीत मोठी दुर्घटना! विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; नेमकं काय घडलं?

Mumbai : मुंबईत अनंत चतुर्दशी व गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रभादेवी येथील प्रसिद्ध ‘केजी मार्गचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत एक भरधाव कार शिरल्याने मोठा अपघात घडला. या दुर्घटनेत चार गणेशभक्त किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना प्रभादेवी परिसरातील काकासाहेब गाडगीळ मार्गावरील इंद्रा टॉवरजवळ रात्रीच्या सुमारास घडली. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात विसर्जन मिरवणूक मार्गस्थ असताना, अचानक MH 01 FD 7147 क्रमांकाची एक भरधाव होंडा सिटी कार अनपेक्षितपणे मिरवणुकीत घुसली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कारने चार जणांना जोरदार धडक दिली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ घटनास्थळी एकच धावपळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त गणेशभक्तांनी चालकावर निष्काळजीपणे आणि अतिवेगाने गाडी चालवल्याचा गंभीर आरोप केला आहे.(Ganpati Visarjan Accident)

तात्काळ कारवाई आणि उपचारांची माहिती

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी कारचालक प्रणव राकेश अग्रवाल (वय 21) याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची कार देखील जप्त करण्यात आली असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात नेण्यात आले होते. या अपघातात जखमी झालेल्या चारही जणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन जखमींवर केईएम (KEM) रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अन्य दोघांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जखमींचे सविस्तर जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले असून चालकाविरोधात कायदेशीर FIR नोंदवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सध्या प्रभादेवी परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.(Ganpati Visarjan Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >