Love And War : संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यानंतर आता या चित्रपटातील विकी कौशलचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. विकी कौशलचा रफ अँड टफ अंदाज फर्स्ट लूक पोस्टरमध्ये पाहायला मिळत असून, त्याचा लूक इंटेन्स आणि रेट्रो व्हाईब देणारा आहे. ओठांत सिगारेट आणि लायटरने ती पेटवताना विकीचा दमदार अंदाज पोस्टरमध्ये दिसत आहे. “नजर मिलेंगी, लेकिन हटेंगी नहीं.” अशी कॅप्शन देत त्याचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.
मुंबई: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित ...
याआधी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचेही फर्स्ट लूक समोर आले होते. रणबीर व्हिंटेज कारमध्ये दिसला, तर आलिया लाल ड्रेसमधील आकर्षक अंदाजात पाहायला मिळाली. ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल ही जोडी एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.