मुंबई: गोरेगाव आणि मुलुंडवाकरांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल. गोरेगाव - मुलुंड लिंक रोड (GMLR)प्रकल्पाचा गोरेगाव ते फिल्म सिटी (दादासाहेब फाळके ...
मुंबई उच्च न्यायालयाने आणि केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमांनुसार तज्ज्ञ समितीच्या शिफारशींचे पालन करत विसर्जनानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आधारित मूर्ती साहित्य तलावात कायमस्वरूपी राहू नये, यासाठी त्याचे संकलन करून पर्यावरणपूरक पद्धतीने तात्पुरते साठवण आणि पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. शिवाय, बीएमसीने या अनुषंगाने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली होती. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली निर्माल्य तसेच गणेशाची मूर्ती संकलन आणि वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून यंदाच्या श्रीगणेशोत्सवादरम्यान सुमारे ९३४ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
🔷यासाठी मुंबईतील विविध विसर्जनस्थळी एकूण ६१३ निर्माल्य कलश आणि ८३८ निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
🧹अनंत चतुर्दशीदिनी… pic.twitter.com/gKLHDQ0AgT
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 26, 2026
शाडू मातीची मुर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळते, पण पीओपीची मुर्ती पाण्यात नैसर्गिकरीत्या लवकर विरघळत नाही. त्यामुळे जर गणपती बाप्पाची पीओपीची मुर्तीचे साहित्य कृत्रिम तलावांमध्ये किंवा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये राहिल्यास पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच, मूर्तींचे अवशेष जलस्रोतांमध्ये किंवा समुद्रकिनाऱ्यावर आढळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. विसर्जनानंतर पीओपी मूर्ती पाण्यामुळे ओलसर किंवा ठिसूळ होत असल्याने संकलन, चढ-उतार आणि वाहतुकीवेळी मुर्तीचे भाग नैसर्गिकरीत्या वेगळे होऊ शकतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणातील साहित्याचे वेळेमध्ये संकलन करण्यासाठी आवश्यकतेनुसार यांत्रिक साधन सामग्रीचाही वापर करण्यात आला. महापालिकेच्या विभागनिहाय (वॉर्ड) पथकांमार्फत विसर्जित मूर्ती संकलित करण्यात आले.
मुंबई : शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून निर्णय घेणं, हीच खरी संवेदनशीलता असल्याचे प्रतिपादन करत भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा ...
संकलित साहित्याच्या वाहतुकीसाठी स्वच्छ आणि झाकलेल्या वाहनांचा वापर करण्यात आला. प्रत्येक वाहनाचे वजन वजनकाट्यावर करून त्याची नोंद घेण्यात आली. तसेच, विभागनिहाय संकलित साहित्याची नोंद, छायाचित्रे, व्हिडिओ तसेच दैनंदिन प्रगती अहवाल तयार करण्यात आले आहेत. यामुळे संकलनापासून तात्पुरत्या साठवणूक केंद्रापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने 26 सप्टेंबर 2026 रोजी निर्माल्य आणि विसर्जित केलेल्या मुर्तींच्या साहित्याची सर्वाधिक वाहतूक करण्यात आली. या दिवशी 131 वाहन फेऱ्यांद्वारे 510.92 मेट्रिक टन निर्माल्य आणि साहित्य गोळा करण्यात आले आहे. परिमंडळनिहाय संकलित साहित्यामध्ये के/ पश्चिम विभागातून 314.82 मेट्रिक टन, एस विभागातून 253.58 मेट्रिक टन आणि डी विभागातून 249.43 मेट्रिक टन साहित्याचा समावेश आहे.
विसर्जनानंतर संकलित करण्यात आलेले मूर्ती साहित्य एकत्रितपणे मुलुंड येथील तात्पुरत्या साठवणूक केंद्रात आणण्यात आले आहे. पुढील टप्प्यात या साहित्याच्या वैज्ञानिक, पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर, पुनर्चक्रण अथवा पुनर्प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.