Sunday, September 27, 2026

गिलचा धूमधडाका..! वेस्ट इंडिजच्या खेळाडूची एक चूक नडली, शुभमनने शतक ठोकलं

गिलचा धूमधडाका..! वेस्ट इंडिजच्या खेळाडूची एक चूक नडली, शुभमनने शतक ठोकलं

वेस्ट इंडिजने पहिल्या वनडे सामन्यात भारतासमोर विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 74 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडिया धावगती चांगल्या स्थितीत आली. पण रोहित शर्मा वैयक्तिक 32 धावांवर असताना बाद झाला आणि धावगतीला ब्रेक लागेल असं वाटलं. पण कर्णधार शुभमन गिलने खेळ पुढे नेला. त्याला दुसऱ्या विकेटसाठी विराट कोहलीची उत्तम साथ मिळाली. शुभमन गिलने विजयी धावांचा पाठलाग करताना संयमी खेळ दाखवला. गरजेवेळी आक्रमक फटकेबाजीही केली. शुबमन गिलने 48 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने शतकही पूर्ण केलं यासह शुभमन गिलने देशात खेळलेल्या सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी दाखवून दिली आहे. मागच्या नऊ सामन्यात शुभमन गिलने 87, 60, 112, 56, 56, 23, 84*, 154 आणि आता शतकी खेळी केली आहे. दुसरीकडे, शुभमन गिलने 67 वनडे डावात 30व्यांदा 50 हून अधिक धावांची खेळी केली आहे.

शुभमन गिलने अर्धशतक ठोकल्यानंतर धावांचा वेग वाढवला. शुभमन गिलने अर्धशतक ठोकल्यानंतर धावांचा वेग वाढवला. पण जास्त आक्रमक न होता मैदानात तग धरून राहण्यावर जोर दिला. त्याने 96 चेंडूत शतक पूर्ण केलं. या खेळीत त्याने 12 चौकार आणि एक षटकार मारला. त्याचा स्ट्राईक रेट हा 101 हून अधिकचा होता.

शुभमन गिलचा सोपा झेल सोडला

खरं तर शुभमन गिलची विकेट पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मिळाली असती. तेव्हा शुभमन गिल 11 धावांवर खेळत होता. जेडन सील्सच्या गोलंदाजीवर कव्हर पॉइंटच्या दिशेने फटका मारताना चुकला आणि सोपा झेल हातात गेला. पण या संधीचं सोनं कीमो पॉलला करता आलं नाही. त्याने हातातला झेल सोडला. त्याचा फायदा शुभमन गिलने उचलला आणि शतक ठोकलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >