Thursday, November 12, 2026

IND vs NZ: रोहित शर्मासोबत ओपनिंग कोण करणार? इशान किशन नाही तर या खेळाडूचं नाव चर्चेत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा वनडे सामना होत आहे. या सामन्यात शुभमन गिल नसेल, त्यामुळे रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण उतरणार? हा प्रश्न आहे. इशान किशनच्या नावाची चर्चा असताना एक भलतंच नाव समोर आलं आहे.

1/5 भारत न्यूझीलंड यांच्यातील चौथा वनडे सामना ओव्हल मैदानात शुक्रवारी खेळला जाणार आहे. या सामन्यात शुभमन गिल नसेल, त्यामुळे रोहित शर्मासोबत ओपनिंग कोण करणार? हा प्रश्न आहे. असं असताना ऋतुराज गायकवाडचं नाव समोर आलं आहे. (Photo: ANI) 2/5 टीम इंडियात ओपनिंगसाठी इशान किशनचं नाव सुरूवातीला आघाडीवर होतं. पण रिपोर्टनुसार ऋतुराज गायकवाडला ओपनिंगची संधी दिली गेली आहे. (Photo: ANI) 3/5 चौथ्या आणि पाचव्या वनडेत शुभमन गिलसह तीन खेळाडू खेळणार नाहीत. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर दिली आहे. ऋतुराज गायकवाडने ओपनिंग केली तर इशान किशनला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागेल. (Photo: ANI) 4/5 न्यूझीलंडमध्ये टीम इंडियासाठी ओपनिंग करणं वाटतं तितकं सोपं नाही. ऋतुराज गायकवाडसाठी हा कठीण पेपर असणार आहे. कारण न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर जम बसवणं कठीण आहे. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडने वनडेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. (Photo: ANI) 5/5 ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत 12 वनडे सामन्यात 36.55 च्या सरासरीने 329 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने शतक मधल्या फळीत फलंदाजी करताना ठोकलं होतं. आता त्याला ओपनिंग करायची आहे. (Photo: ANI)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >