Madhuri Dixit : माधुरीच्या ‘कोण होणार करोडपती’ची सातासमुद्रापार क्रेझ; चाहत्यांची प्रतीक्षा संपली, तारीख जाहीर

मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका अगदी नव्या आणि रंजक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. लोकप्रिय मराठी रियालिटी शो ‘कोण होणार करोडपती’च्या सूत्रसंचालनाची धुरा आता माधुरी दीक्षित सांभाळणार असून, तिच्या या नव्या प्रवासाची उत्सुकता आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेली नाही, तर तिची ही क्रेझ देशाच्या सीमा ओलांडून थेट जगभरात पोहोचली आहे. सोनी मराठी वाहिनीने नुकताच या शोचा एक नवीन आणि हटके प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये सिंगापूर, दुबई आणि मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) यांसारख्या जगातील प्रमुख शहरांमधील चाहत्यांचा प्रचंड उत्साह आणि त्यांच्या भरभरून प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. माधुरीने आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्याने गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तिची तीच जादू आणि चाहत्यांसोबतची आपुलकी आजही जगभरात कायम असल्याचं या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होत आहे.(Madhuri Dixit Kon Honar Crorepati)



मुंबईपासून मेलबर्नपर्यंत आणि दुबईपासून सिंगापूरपर्यंत माधुरीची लोकप्रियता पसरलेली आहे. अनेक पिढ्यांनी तिला पडद्यावर पाहून भरभरून प्रेम दिले आहे. आता याच लाडक्या अभिनेत्रीला ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर बसून सूत्रसंचालन करताना पाहण्यासाठी जगभरातील चाहते कमालीचे आतुर झाले आहेत. या शोबद्दल बोलताना, माधुरीची अस्सल शैली, तिची सहजता आणि उपजत आपुलकी यामुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा आगामी अध्याय अधिक खास आणि संस्मरणीय ठरणार आहे. या पर्वातून प्रेक्षकांना केवळ ज्ञानाची परीक्षाच नाही, तर स्वप्न, भावनांचा प्रवास आणि खेळाचा रोमांचक थरार यांचा एक अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. गेल्या काही काळापासून या शोची बरीच चर्चा सुरू होती आणि अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. हा रोमांचक प्रवास येत्या 12 ऑक्टोबर 2026 पासून, दर सोमवार ते शनिवार, रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. माधुरीच्या या नव्या इनिंगसाठी चाहते आणि प्रेक्षक अत्यंतोत्सुक आहेत.(Madhuri Dixit Kon Honar Crorepati)

Comments
Add Comment

Anjali Anand News: “वजन कमी कर, त्यानंतर...”, कास्टिंग डायरेक्टरने अभिनेत्रीला दिलेला सल्ला; म्हणाली, “अभिनय सोडण्याचा…”

मुंबई: अभिनेत्री म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर पटकन स्लिम- ट्रीम असलेली अभिनेत्री नजरेसमोर येते. पण त्याला अपवाद

Ramayana Movie Update : 'रामायण' चित्रपटातील 'रॉकिंग स्टार' यशचा रावणाचा राजेशाही लूक प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!

मुंबई : चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित असा दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा आगामी

Awarapan 2 OTT Release : 'इम्रान हाश्मी'चा सुपरहिट सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार! ‘आवारापन 2’ची OTT रिलीज डेट जाहीर

मुंबई : 'इम्रान हाश्मी'च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. थिएटरमध्ये दमदार कमाई करणारा ‘आवारापन 2’ आता OTTवर दाखल

Prahaar Trailer: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा ट्रेलर मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणी रिलीज होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला...

मुंबई: गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बायोपिकने चांगलाच धुमाकूळ घातला. त्या व्यक्तीच्या आयुष्य रूपेरी पडद्यावर

The Paradise Box Office : नानीच्या ‘द पॅराडाईज’ची बॉक्स ऑफिसवर घसरण; 2 दिवसांतच कमाईचा वेग मंदावला

मुंबई : नानी अभिनीत ‘द पॅराडाईज’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट झाली आहे. बुधवारी झालेल्या

Panchayat Series: 'मिर्झापूर'नंतर 'पंचायत' सीरीजचाही चित्रपट बनणार का? 'प्रधान जी'ने दोन वाक्यातच सर्व काही सांगितलं...

मुंबई: ओटीटी गाजवल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 'मिर्झापूर: द मुव्ही' चित्रपट रिलीज झाला होता. ओटीटी प्रमाणेच त्याला बॉक्स