वेस्ट इंडिजचा डाव
वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल आणि जस्टीन ग्रीव्ह्स ही जोडी फलंदाजीसाठी ओपनिंगला आली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 135 धावांची विक्रमी भागीदारी केली. जॉन कॅम्पबेलने 60 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली आणि बाद झाला. त्यानंतर ग्रीव्ह्स मैदानात तग धरून होता. त्याला केसी कार्टी आणि शाई होपची थोडी फार साथ मिळाली. पण ते फार काळ तग धरू शकले नाहीत. केसी कार्टी 13, शाई होप 15 धावा करून बाद झाले. तर जस्टीन ग्रीव्ह्सने 108 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. त्यानंतर त्याची विकेट पडली. त्याच्यापाठोपाठ जेवेल अँड्र्यू याची विकेट पडली. त्याला खातही खोलता आलं नाही. तर आमिर जांगुने अर्धशतक ठोकून विंडीज संघाला चांगल्या स्थितीत आणलं.
भारत वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरम येथे सुरू आहे. या सामन्यात ...
भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी गोलंदाजी केली. त्याच्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजचे चार फलंदाज अडकडे. कुलदीप यादवने 10 षटकात 40 धावा देत 4 गडी बाद केले. प्रसिद्ध कृष्णाने 10 षटकात 2 गडी बाद करत 60 धावा दिल्या. नितीश कुमार रेड्डीने सुरूवातीला सुमार गोलंदाजी केली. पण शेवटच्या षटकात त्याला काही अंशी दिलासा मिळाला. नितीश कुमार रेड्डीने 5 षटकात 45 धावा देत 1 विकेट काढली. दुसरीकडे, गुरनूर ब्रार सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने सहाच्या इकोनॉमीने 60 धावा दिल्या. पण एकही विकेट घेता आली नाही. रवींद्र जडेजाने 10 षटकात 54 धावा दिल्या, नमन धीरने 5 षटकात 33 धावा दिल्या. या तिघांना एकही विकेट मिळाली नाही.