भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून वनडे मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा प्लेइंग 11 चा भाग असतील यात काही शंका नाही. या दोघांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. असं असताना या सामन्यापूर्वी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि भविष्याबाबत मोठं विधान केलं आहे. 37 विराट कोहलीने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेबाबत आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे. त्याच्या विधानामुळे गेल्या काही दिवसांपासून उडालेला धुराळा शांत झाला आहे. विराट कोहलीने स्पष्ट केलं की, दक्षिण अफ्रिकेत होणारी 2027 वर्ल्डकप स्पर्धा ही त्याच्यासाठी शेवटची स्पर्धा असणार आहे. विराट कोहलीने सांगितलं की, 'हा भारतासाठी माझा शेवटचा विश्वचषक असेल आणि हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे.'
विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. 2026 मध्ये खेळलेल्या सहा वनडे सामन्यात त्याने 64 च्या सरासरीने384 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर शेवटच्या दहा वनडे सामन्यात त्यानेतीन शतकं आणि पाच अर्धशतकं ठोकली आहेत. विराट कोहलीने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेबाबत सांगितलं की, 'मला मैदानावर माझे सर्वस्व द्यायचे आहे. विश्वचषक जिंकणे हे आमचे निश्चित ध्येय आहे आणि त्यासाठी जे काही त्याग आणि कठोर परिश्रम लागतील, त्यासाठी मी तयार आहे.' विराट कोहलीचा फॉर्म पाहता वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी असं दिसत आहे. पण मागच्या दोन वनडे मालिकांचा विचार केला तर त्याला फार काही यश मिळालेलं नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
अजून काही संपलं नाही...! वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी रोहित शर्माचं मोठं विधान, मनात नेमकं काय आहे सुरू?
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी भारतीय संघात खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या ...
कर्णधार शुभमन गिलवर उधळली स्तुतीसुमनं!
विराट कोहलीने कर्णधार
शुभमन गिलच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं. विराट कोहली म्हणाला की, 'शुभमन कर्णधार म्हणून बरंच काही शिकत आहे आणि या भूमिकेत तो नवीन आहे. पण टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी त्याच्याकडे योग्य वृत्ती आणि आक्रमकता आहे. मैदानावर आपण कसे खेळले पाहिजे याबद्दलच्या त्याच्या योजना खूप स्पष्ट आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संघाला योग्य दिशेने नेण्याची जिद्द त्याच्यामध्ये आहे.'