Asian Games 2026: पावसानं घातला खोडा, पण 'या' नियमामुळे टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक!

भारतीय क्रिकेट संघ आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचली आहे. रविवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना सुरू होण्यापूर्वी काही वेळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, मैदानाची स्थिती खेळासाठी योग्य नसल्याने सामना होऊ शकला नाही.

Asian Games 2026: भारतीय क्रिकेट संघ आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचली आहे. रविवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना सुरू होण्यापूर्वी काही वेळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, मैदानाची स्थिती खेळासाठी योग्य नसल्याने सामना होऊ शकला नाही. ( India vs Afghanistan)


सामना रद्द झाल्यानंतर भारताच्या उच्च मानांकनाचा फायदा भारतीय संघाला झाला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नियमांनुसार बाद फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांपैकी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला पुढील फेरीत प्रवेश दिला जातो. सध्या भारत टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, तर अफगाणिस्तान 10व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले.



भारताला मिळाली मैदानावर न उतरता पुढील फेरीत जाण्याची संधी


उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे सामना खेळवता न आल्यास क्रमवारीच्या आधारे पुढील फेरीतील संघ निश्चित करण्याचा नियम लागू करण्यात आला. पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द झाल्याने भारताला मैदानावर न उतरता पुढील फेरीत जाण्याची संधी मिळाली.





दरम्यान,भारत आणि पाकिस्तानने आपापल्या उपांत्य फेरीतील सामन्यांत विजय मिळवल्यास अंतिम सामन्यातही दोन्ही संघांमध्ये सामना होऊ शकतो.


 
Comments
Add Comment

IND vs NZ 4th ODI: रोहित शर्मा आणि इशान किशनची चूक भारतीय संघाच्या अंगलट आली, 120 धावांचा फटका बसला Video

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा वनडे सामना माऊंट माऊगानुई येथे सुरू आहे. या सामन्यात भारताच्या बाजूने

W,W,W..! पहिल्या षटकात भारताच्या शून्य धावा आणि तीन विकेट, असं पहिल्यांदाच घडलं आणि रोहित-विराटसोबत दुसऱ्यांदा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा वनेड सामना बे ओव्हलच्या माऊंट माऊंगनाई येथे होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा

Dakar Youth olympics 2026 : भारताचा ऐतिहासिक सुवर्णप्रवास; 9 पदकांसह पदकतालिकेत दिमाखदार कामगिरी

डकार (सेनेगल) : डकार येथे सुरू असलेल्या चौथ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय युवा खेळाडूंनी दमदार

आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत अक्षर पटेल; फ्रँचायझीमध्ये खळबळ!

नवी दिल्ली : आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 च्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर येत

IND Vs NZ 4th ODI Live Streaming: चौथा वनडे सामना कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या खेळपट्टीसह सर्व बाबी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तीन सामन्यानंतर 2-0 अशी स्थिती आहे.

IND vs NZ: रोहित शर्मासोबत ओपनिंग कोण करणार? इशान किशन नाही तर या खेळाडूचं नाव चर्चेत

[caption id="attachment_1074512" align="aligncenter" width="800"] भारत न्यूझीलंड यांच्यातील चौथा वनडे सामना ओव्हल मैदानात शुक्रवारी खेळला जाणार आहे. या