केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींसोबतच महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) बाबत मोठी प्रतीक्षा आहे. मागील पद्धती आणि आगामी सणांचा काळ पाहता, सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.(DA Increase 2026)
घोषणेबाबत वाढत्या अपेक्षा
कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्सचे (CCGEW) सरचिटणीस एम. एस. वेंकटेशन यांनी अलीकडेच अर्थ मंत्रालयाला पत्र लिहून डीए वाढीच्या घोषणेची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली होती. ऑल इंडिया न्यू पेन्शन स्कीम एम्प्लॉईज फेडरेशन आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनच्या सूत्रांनुसार, संबंधित फाईल प्रक्रियेत असून या आठवड्यात कधीही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(DA Increase 2026)
गेल्या आठवड्यात लॉन्च झाल्यानंतर, लावा विराट कर्व्ह 5G आजपासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होईल. या स्वदेशी ब्रँडच्या नवीनतम हँडसेटमध्ये मागील बाजूस एक ...
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता
सरकार अनेकदा सणांच्या आसपास डीए वाढीची घोषणा करत आले आहे. गेल्या वर्षी दसरा 2 ऑक्टोबरला होता आणि डीए वाढीची घोषणा 6 ऑक्टोबरला करण्यात आली होती, तर 2024 मध्ये दसरा 12 ऑक्टोबरला होता आणि घोषणा 21 ऑक्टोबरला झाली होती. यंदा दसरा 20 ऑक्टोबरला असल्यामुळे, सरकार सणापूर्वीच डीए वाढ जाहीर करू शकते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किती वाढ होऊ शकते डीए मध्ये?
यापूर्वी सरकारने होळीच्या निमित्ताने मार्चऐवजी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात 2% वाढीची घोषणा केली होती, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता 58% वरून 60% झाला होता. आता आगामी काळासाठी डीएमध्ये 3% वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जर हे अंदाज खरे ठरले, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढून 63% होईल.(DA Increase 2026)






