Dattatray Bharne News: ‘सरकार तुमच्यासोबत, डगमगू नका...’, मंत्री दत्तात्रय भरणेंचं शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई: राज्यभर पावसात पडलेला खंड आणि एल निनोच्या परिणामांमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता शेतकऱ्यांचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागले आहे. परतीचा पाऊस झाला तर रब्बी हंगामातून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र, परतीचा पाऊसही लांबला तर शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी डगमगू नये, सरकार त्यांच्या पाठीशी असून मदत केली जाईल, असे आवाहनही त्यांनी केले.



हवामान विभागाच्या अंदाजावर सरकार अवलंबून असते. हवामान तज्ज्ञांचे अंदाज कधी चुकतात, तर कधी ते अचूक ठरतात. मात्र, एल निनोचे संकट आहेच. पावसाळ्यात पावसाऐवजी ऊन पडल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी उन्हाळ्यातही अधिक तीव्र उष्णतेचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे परतीचा पाऊस पडावा, अशी प्रार्थना आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून पाऊस झाला तर रब्बी हंगामात काही तरी हाती लागण्याची शक्यता आहे, असे भरणे यांनी सांगितले.


पावसातील खंडामुळे पिके जळाली असून हे निसर्गाचे संकट आहे. या संकटाचा सामना सर्वांना करावा लागेल. अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांसोबत असून त्यांना मदत केली जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले. शासनाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातील. शेतीबरोबरच पशुधन आणि रोजगाराच्या प्रश्नांबाबतही परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात वेगळा विचार न करता सरकारसोबत असल्याची खात्री बाळगावी आणि डगमगू नये, असे आवाहन त्यांनी केले.




पंचनाम्यानंतर मदतीची प्रक्रिया


नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून केंद्राकडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ)च्या माध्यमातून मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असल्याचे भरणे यांनी सांगितले. पंचनामे पूर्ण होण्यापूर्वीच आर्थिक मदत देण्याची मागणी होत असताना, मदतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शनिवारी यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली असून सोमवारी त्यावर पुढील प्रक्रिया सुरू आहे. शक्य तितक्या लवकर मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे भरणे यांनी सांगितले. ‘आम्हीही शेतकरी आहोत. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांचे दु:ख आम्हाला माहीत आहे. शेतीशी आमचे नाते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Rakul Preet Singh News: रकुल प्रीत सिंग, निर्माता वासू भगनानीशी संबंधित 12 ठिकाणी IT चे छापे, तपास सुरू; नेमकं प्रकरण काय?

मुंबई: आयकर विभागाच्या मुंबई शाखेने अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सोबत तिचे सासरे आणि निर्माते वाशु भगनानी यांच्या

Central Railway : मध्य रेल्वेवर 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान सखोल तिकीट तपासणी मोहीम; एक तिकीट, एक मूळ ओळखपत्र अनिवार्य

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या

Kalyan Dombivli Water Cut: कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी संकट! कोणत्या परिसरात राहणार पाणी पुरवठा बंद; वाचा A To Z माहिती

कल्याण: कल्याण- डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण- डोंबिवली महानगपालिका क्षेत्रामध्ये उद्या

Mumbai Mobile Theft Gang: लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये भाविकांचे 192 मोबाईल चोरीला, पोलिसांनी 18 जणांना केली अटक

मुंबई: मुंबईतील सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनासाठी राज्यासह देशभरातून भाविक उपस्थित होते. यावेळी भाविकांसह

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिल्यानंतर

Devsthan Inam Land : देवस्थान इनाम जमीन प्रारूप समितीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्यभरातून प्राप्त झालेल्या हरकतींमुळे निर्णय

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींच्या व्यवस्थापनात आणि कायदेशीर चौकटीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यासाठी