Himlung Himal avalanche : नेपाळमध्ये हिमलुंग हिमालयात हिमस्खलन; मृतांची संख्या ४ वर, १२ जण अजूनही बेपत्ता अन् शोधमोहीम सुरूच!

काठमांडू : नेपाळमधील अतिउंच मनांग जिल्ह्यात असलेल्या 'हिमलुंग हिमाल' (Himlung Himal) च्या बेस कॅम्पवर भीषण हिमस्खलन (Avalanche) होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या आणखी दोन गिर्यारोहकांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले असून, आतापर्यंत एकूण ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती 'नेपाळ नॅशनल माउंटेन गाईड असोसिएशन'ने (NNMGA) दिली आहे. सोमवारी बचाव पथकाने बीरेंद्र गुरुंग आणि घनश्याम राय या दोन गिर्यारोहकांचे मृतदेह बाहेर काढले. याआधी रविवारी छेबी भोटे आणि पासांग भोटे यांचे मृतदेह सापडले होते. प्रतिकूल हवामानाचे आव्हान असतानाही शोध आणि बचाव पथक दररोज ३ ते ४ तास सातत्याने घटनास्थळी काम करत आहे. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त करत, सर्व बेपत्ता लोकांचा शोध लागेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.



अजूनही १२ जण बेपत्ता; बचावकार्यात

">अडथळे

'द काठमांडू पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, या भीषण हिमस्खलनानंतर अजूनही १२ गिर्यारोहक बेपत्ता आहेत. मोहीम संयोजक मिंग्मा ग्यालजे शेर्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हा बर्फाचा कडा कोसळला. बेपत्ता झालेल्यांमध्ये त्यांच्या पथकातील स्वयंपाक घरातील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यात हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर अनेक गिर्यारोहक आणि रोप-फिक्सिंग पथकांनी डोंगरदऱ्यांमधून सुरक्षित स्थळी माघार घेतली होती, मात्र काही जण तेथेच थांबून राहिल्याने ही दुर्घटना घडली.



७,१२६ मीटर उंचीवर कठीण परिस्थिती



७,१२६ मीटर उंच असणारा 'हिमलुंग हिमाल' हा गिर्यारोहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय मानला जातो. मात्र, मनांग जिल्ह्यातील या दुर्गम भागात हेलिकॉप्टर उड्डाणासाठी विशेष परवानगीची गरज असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात सतत होणाऱ्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे शरद ऋतूतील गिर्यारोहण मोहीम पूर्णपणे थांबवावी लागली आहे.



बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे नेपाळमध्ये हाहाकार


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान बदलांमुळे नेपाळच्या पर्वतीय भागात प्रचंड बर्फवृष्टी, तर मैदानी भागात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. खराब हवामानामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली असून, पर्यटन विभागाने सर्व ट्रेकिंग आणि गिर्यारोहण मोहिमा तात्पुरत्या स्थगित करण्याचे तातडीचे आदेश जारी केले आहेत.



नेपाळमध्ये पाऊस आणि भूस्खलनाने १४०० हून अधिक बळी


नेपाळमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलप्रलय आणि भूस्खलनाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान २१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. २४७ हून अधिक कुटुंबांना याचा थेट फटका बसला असून २६० हून अधिक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. महिनाभरापूर्वी आलेल्या भोटेकोशी पुराच्या महाप्रलयात १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो जण बेपत्ता झाले होते, तोच नेपाळवर या नव्या संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे.

Tags
Breaking News Marathilatest marathi newsmarathi news channelmarathi news todayinternational news MarathiWorld News Marathinepal rescue operationNepal Disaster UpdateNepal News MarathiNepal AvalancheNepal avalanche newsHimlung Himal avalancheNepal news todayHimlung Himal accidentavalanche in NepalHimalayas avalanche
Comments
Add Comment

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्यातून बचावले नवे सर्वोच्च नेते; मोजतबा खामेनेईंबाबत इराणी नेत्याचा खळबळजनक दावा

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांदरम्यान इराणच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी

US Iran Conflict : इराणची आर्थिक कोंडी, होर्मुझचा पेच! ट्रम्प काय निर्णय घेणार?

वॉशिंग्टन : मध्य पूर्वेतील भू-राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

Nepal avalanche : नेपाळमध्ये निसर्गाचा कोप; हिमलुंग हिमाल बेस कॅम्पवर भीषण हिमस्खलन, 10 जण बेपत्ता

काठमांडू : शेजारील नेपाळ देश सध्या तीव्र नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात सापडला आहे. पश्चिम नेपाळमधील तिबेट

Canada Helicopter Crash : कॅनडात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले

कॅनडा : कॅनडातील (Canada) मॉन्ट्रियलच्या दक्षिणेकडील भागात शनिवारी, 26 सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

India Pakistan UN : 'रात्री दहशतवाद, दिवसा सुरक्षेचा उपदेश करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,' UN मध्ये भारताचे सडेतोड प्रत्युत्तर

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी

Plane Crash : विमानाचा भीषण अपघात ! दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू

Plane Crash : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये विमानाचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन वरिष्ठ