Pune Crime Vaishnavi Jarande : ४० लाखांचं लग्न अन् १० तोळे सोनं देऊनही ५ लाखांसाठी छळ; पुण्यात ३ महिन्यांच्या गरोदर तरुणीचा मृत्यू

पुणे : पुण्यातील उंड्री (वडाचीवाडी) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. २६ वर्षीय आयटी (IT) क्षेत्रात कार्यरत असलेल्या वैष्णवी नावाच्या तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली असली, तरी वैष्णवीच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या लोकांनीच तिची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे मृत वैष्णवी तीन महिन्यांची गरोदर होती. याप्रकरणी तिच्या पतीसह सासू आणि सासऱ्यांवर कडक कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी आक्रमक मागणी आता तिच्या पालकांनी केली आहे.



४० लाखांचं लग्न अन् १० तोळे सोने देऊनही ५ लाखांच्या कारसाठी छळ (Pune Crime)


मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता. मुलीच्या सुखाचा विचार करून पालकांनी लग्नात कोणताही हातचा राखून न ठेवता तब्बल ४० लाख रुपये खर्च केले होते. तसेच आपल्या इच्छेने मुलीला १० तोळे सोनेही दिले होते. मात्र, लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच सासरच्या लोकांची पैशांची हाव वाढू लागली. चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी पती आणि सासू-सासऱ्यांकडून वैष्णवीचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. वैष्णवीच्या माध्यमातून माहेरहून सातत्याने पैसे उकळण्याचा सासरच्यांचा डाव होता, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.



"मला हलक्यात घेऊ नका, मी काहीतरी करेन..." आदल्या रात्री आलेल्या फोनने वाढवला संशय


मृत्यूच्या आदल्या रात्री वैष्णवी आणि तिच्या सासरच्यांचे भयानक वास्तव समोर आले. रात्री साडेनऊच्या सुमारास वैष्णवीने पालकांना 'गुड नाईट'चा मेसेज पाठवला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधला असता, तिने "मला इथे खूप त्रास दिला जातोय, तुम्ही उद्या सकाळी लवकर या, आपण मार्ग काढू," अशी विनंती केली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन तासांत म्हणजेच रात्री ११:३० वाजता तिच्या पतीचा फोन आला. "तुमच्या मुलीला इथून घेऊन जा... मला हलक्यात घेऊ नका, मी काहीतरी भयंकर करेन," अशी धमकी तिच्या नवऱ्याने दिली. या फोननंतर काही वेळातच तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने हा प्रकार आत्महत्या नसून सासरच्यांनी रचलेला हत्येचा कट असल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे.



पोटातील बाळासह लेकीला गमावल्याने कुटुंबाचा आक्रोश; न्यायाची मागणी (Pune Crime)


आयटी कंपनीत चांगल्या पदावर काम करणाऱ्या आणि स्वावलंबी असलेल्या वैष्णवीला अवघ्या पाच महिन्यांत अशा भयंकर प्रसंगाला सामोरे जावे लागेल, अशी कल्पनाही तिच्या पालकांनी केली नव्हती. पोटातील तीन महिन्यांच्या निष्पाप जिवासह वैष्णवीचा असा अंत झाल्याने तिच्या आई-वडिलांचा आक्रोश काळजाचा ठोका चुकवणारा आहे. "आमच्या मुलीने स्वतःचे आयुष्य संपवले नसून सासरच्यांनीच तिची हत्या केली आहे; दोषींना फाशीची शिक्षा मिळाल्याशिवाय तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही," असा ठाम पवित्रा जरांडे कुटुंबाने घेतला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : शिवणाटाकळी तलावातील पाणीपातळीत घट; पंचनाम्यानंतर पात्र मच्छीमारांना मदत मिळवून देणार - मंत्री नितेश राणे

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

‘मफलरवाला’ नेता कोण? १० ऑक्टोबरला नाव जाहीर करणार- अजित पवारांच्या अपघातप्रकरणी रोहित पवारांचा दावा

व्हीएसआर कंपनीला सत्तेच्या जोरावर वाचविले जात असल्याचा आरोप मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या

Illegal Sand Mining : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यावर महसूल विभागाची कारवाई

- अवैध वाळू उत्खननप्रकरणी ४.९० कोटींचा दणका; दंडातून वगळण्याचा तहसीलदारांचा आदेश रद्द मुंबई : मनोज जरांगे पाटील

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाची चिंता कायम; 265 तालुक्यांत दुष्काळाची नोंद; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात यंदा पावसाची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक भागांत अजूनही

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मुंबई : दुष्काळामुळे तलावांमधील मत्स्यव्यवसायावर झालेला परिणाम आणि नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या जाणून

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रामध्ये पुन्हा हवामान बदल, 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट; मुंबई- पुण्याची स्थिती काय?

मुंबई: गणेशोत्सवानंतर राज्यातील हवामानात पुन्हा मोठे फेरबदल जाणवणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या