NPS Preference Index 2026 : निवृत्तीसाठी किती कोटी हवेत? भारतीयांचा अंदाज किती कमी?

मुंबई: भारतातील प्रमुख पेन्शन फंड व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या HDFC पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेडने 'एनपीएस प्राधान्य निर्देशांक अभ्यास 2026' (NPS Preference Index Study 2026) हा नवीन संशोधन अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. 2023 मधील पहिल्या अहवालानंतरचा हा दुसरा संशोधन अहवाल असून, यात भारतीय नागरिकांचा निवृत्ती नियोजनाबाबतचा दृष्टिकोन, त्यांचे वर्तन आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेला (NPS) मिळत असलेले प्राधान्य यावर सविस्तर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या सविस्तर अहवालाचे प्रकाशन पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (PFRDA) अध्यक्ष श्री. एस. रमण आणि HDFC पेन्शन फंडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीराम अय्यर यांच्या हस्ते पार पडले.



निर्देशांकात वाढ आणि भारतीयांचा बदलता दृष्टिकोन


संशोधनानुसार, भारताचा एनपीएस प्राधान्य निर्देशांक 54 वरून वाढून 57 अंकांवर पोहोचला आहे. ही वाढ प्रामुख्याने योजनेबाबतच्या स्वीकृती (Consideration) या भावनेमुळे झाली असून ती 6 अंकांनी वाढून 59 वर पोहोचली आहे. त्यानंतर ओळख (Familiarity - 58) आणि आकर्षण (Appeal - 56) यांचा क्रमांक लागतो. यावरून भारतीय बचतकर्ते आता एनपीएसबाबत केवळ वरवरच्या माहितीच्या टप्प्यातून बाहेर पडून, या योजनेचे सक्रियपणे मूल्यांकन (Active Evaluation) करण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट होते.



निवृत्ती निधीचा अपुरा अंदाज


या संशोधनातील एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे निवृत्तीनंतर लागणारा 'आदर्श निधी' (Ideal Corpus) हा आहे. भारतीयांच्या अंदाजानुसार, निवृत्तीपश्चात जीवनासाठी आता 1.5 कोटी रुपये इतका निधी आवश्यक वाटतो (जो २2023 मध्ये 1.34 कोटी रुपये होता). तरीही, ही रक्कम सरासरी वार्षिक कुटुंबाच्या उत्पन्नाच्या दहा पटीपेक्षाही कमी आहे. लोकांना वाटते त्या गरजेमध्ये आणि प्रत्यक्षात येणाऱ्या खर्चामध्ये अजूनही मोठी तफावत कायम आहे.



प्रमुख चिंता आणि प्राधान्ये




  • सर्वोच्च प्राधान्ये: निवृत्तीपश्चात नियोजन हे ग्राहकांच्या सर्वोच्च आर्थिक प्राधान्यांमध्ये असून, वैद्यकीय खर्च (45%), आणीबाणीचा निधी (39%) आणि मुलांचे शिक्षण (35%) यांच्यानंतर त्याला स्थान मिळाले आहे.




  • प्रमुख चिंता: वाढता आरोग्यविषयक खर्च (47%) आणि वयाशी संबंधित आरोग्य समस्या (44%) या निवृत्तीबद्दलच्या प्रमुख चिंता असल्याचे समोर आले आहे. तसेच सर्वेक्षणातील 69% व्यक्तींनी निवृत्तीनंतर कुटुंब किंवा मुलांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.




नावनोंदणीत वाढ आणि NPS वात्सल्य


एनपीएसमधील अलीकडील सुधारणा जसे की 100% इक्विटी गुंतवणूक आणि लवचिक पर्याय हे नावनोंदणीचे मुख्य कारण ठरले आहेत. तसेच, अल्पवयीन मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'एनपीएस वात्सल्य' (NPS Vatsalya) या योजनेबद्दल पालकांमध्ये 28% जनजागृती असल्याचे आढळले असून, कर बचतीचे फायदे (44%) आणि दीर्घकालीन बचतीची शिस्त (41%) ही यामागील प्रमुख कारणे सांगितली आहेत.(HDFC Pension Report)

Comments
Add Comment

सोमवार की रविवार? आठवड्याच्या कोणत्या दिवशी चालतो विराट कोहलीचा सर्वाधिक धुमाकूळ? वाचा आकडेवारी

विराट कोहली हे क्रिकेटविश्वातील खूप मोठं नाव आहे. भारतीय क्रिकेटविश्वात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक नावलौकिक

Maharashtra Government : आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर बंधनकारक - सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश

सरकारी कार्यालयांत सौजन्याची वागणूक, महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी दोन तास राखीव मुंबई : आमदार आणि

महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेला गती देणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ॲक्शन प्लॅन'!

मुंबई: राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी सहा महिन्यांत सुधारणा आणि कृतीचा आराखडा तयार

WhatsApp Safety : 'व्हॉट्सॲप' अकाउंट बॅन होऊ नये यासाठी 4 गोष्टी टाळा; छोट्या चुकाही पडू शकतात महागात

मुंबई : WhatsApp आजच्या काळात संवादाचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. त्यामुळे अचानक WhatsApp Account Ban झाल्यास मोठी अडचण निर्माण

विराट कोहलीचा 60 शतकांचा विक्रम मोडणं खूपच कठीण! असं का ते जाणून घ्या

वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने 8 गडी राखून जिंकला. या विजयात कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली

Asian Games 2026 : नीरज चोप्राच्या अनुपस्थितीतही भारताची चमकदार कामगिरी; यशवीर सिंगला रौप्य तर रोहित यादवला कांस्यपदक

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताचा