सणासुदीपूर्वी मोठा झटका! AC-टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार? दरवाढीची शक्यता

नवी दिल्ली: यंदा ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. या सणासुदीच्या काळात भारतीय ग्राहकांकडून एसी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, यंदा सणांच्या आधीच ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागू शकतो. एक ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून विविध कारणांमुळे दरवाढीची तयारी करण्यात आली आहे. धातूंच्या किमतीत झालेली वाढ, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, कच्च्या मालाचा वाढलेला खर्च तसेच आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती यामुळे उत्पादन आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, कंपन्यांनी या वाढलेल्या खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध माहितीनुसार, एक ऑक्टोबरपासून होणारी ही दरवाढ चालू वर्षातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीतील तिसरी वाढ ठरणार आहे. तांबे, ॲल्युमिनियम आणि कच्च्या तेलापासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या किमती वाढल्याने कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर थेट परिणाम झाला आहे. याशिवाय, वाहतूक खर्चही वाढल्याने उत्पादनांच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.(AC TV price hike)



एसी, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत साधारण तीन ते आठ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये विशेषतः एसीच्या किमतीत पाच ते आठ टक्क्यांची वाढ होऊ शकते, तर वॉशिंग मशीन, फ्रीज आणि एलईडी टीव्हीच्या किमतीत तीन ते चार टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर मोठा ताण पडणार आहे. ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डाइकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्स यांसारख्या प्रमुख कंपन्यांकडून चार ते दहा टक्क्यांपर्यंत दरवाढ लागू करण्यात आली आहे. याशिवाय, एलजी आणि बॉश होम कम्फर्टनेही एसीच्या किमती पाच टक्क्यांनी वाढवल्या आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, उत्पादन खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे पंधरा टक्क्यांची वाढ झाली असून, कंपन्या टप्प्याटप्प्याने हा खर्च ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत.(AC TV price hike)

Comments
Add Comment

Man Ki Baat : पंतप्रधानांच्या 'मन की बात'मध्ये महाराष्ट्राच्या अष्टविनायक परंपरेचा गौरव; थायलंडच्या नागरिकाने उभारले भव्य गणेश संग्रहालय!

नवी दिल्ली : भारताची सांस्कृतिक परंपरा आणि गणेशोत्सवाचा गोडवा आता केवळ देशातच नव्हे, तर सातसमुद्रापार पोहोचला

30 दिवसांचे प्लॅन्स अन् व्हॉईस-एसएमएसचे पर्याय दाखल; खासदार राघव चड्ढांची प्रीपेड युजर्ससाठी मोठी घोषणा! काय बदल झाले आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली : देशातील करोडो मोबाईल प्रीपेड युजर्ससाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खासदार

Free Aadhaar Card Update : मुलांचे आधार कार्ड अपडेट केले का? 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार मोठी सवलत; नाहीतर...

आधार कार्ड हे  भारतातील महत्त्वाचे ओळखपत्र असून अनेक सरकारी आणि शैक्षणिक कामांसाठी त्याचा वापर केला जातो.

Bengaluru AI camera : शेवटी AI चुकलंच! गिटारला हेल्मेटविना सहप्रवासी समजून ठोठावला ₹500 चा दंड; नेमकं प्रकरण काय?

बंगळुरू : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वाहतूक नियमभंगावर नजर ठेवणाऱ्या कॅमेऱ्याने चक्क गिटारला व्यक्ती

Kanyakumari Theft : एका रीलने खेळ खल्लास! YouTuber दाम्पत्याची 'ती' चूक अन् चोरट्यांनी मारला घरात डल्ला; पोलिसही चक्रावले

तामिळनाडू : सोशल मीडियावर आपली जीवनशैली आणि घरातील गोष्टी शेअर करणे आता अनेकांसाठी रोजच्या आयुष्याचा भाग बनला

Chardham Yatra News: भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी बंद; उत्तराखंडमध्ये अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई: चारधाम यात्रेकरूंच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. खराब हवामानामुळे चार धाम यात्रा दोन दिवसांकरिता