Beed Bottle Mic Reporting : ‘आम्हाला अधिकारी व्हायचंय, फक्त शिक्षक द्या...’; बॉटल माईक घेऊन चिमुकल्यांनी मांडली समस्या, प्रशासनानेही घेतली दखल

“आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या...” अशी भावनिक हाक देत बीडच्या हिवरापहाडी येथील चिमुकल्या विद्यार्थिनींनी केलेल्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची अखेर दखल घेण्यात आली आहे. या विद्यार्थिनींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. त्यांच्या निर्देशानंतर हिवरापहाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड : “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या...” अशी भावनिक हाक देत बीडच्या हिवरापहाडी येथील चिमुकल्या विद्यार्थिनींनी केलेल्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची अखेर दखल घेण्यात आली आहे. या विद्यार्थिनींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. त्यांच्या निर्देशानंतर हिवरापहाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. (Beed Bottle Mic Reporting)


हिवरापहाडी (केंद्र जरूड), ता. बीड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे समोर आले होते.






आपल्या शाळेतील ही समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थिनींनी अनोखी शक्कल लढवली. पाणी पिण्याच्या प्लास्टिक बॉटलचा माईक तयार करून त्यांनी थेट वर्गातूनच ‘रिपोर्टिंग’ केली. शिक्षक नसल्याने होणाऱ्या अडचणी त्यांनी आपल्या शब्दांत मांडल्या आणि “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या...” अशी मागणी केली. (Beed Bottle Mic Reporting)


विद्यार्थिनींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत बीड जिल्हा प्रशासनाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.






या निर्देशानंतर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभाग ॲक्शन मोडमध्ये आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती करण्यात आली आहे.(Beed Bottle Mic Reporting)


चिमुकल्या विद्यार्थिनींच्या अनोख्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगमुळे दुर्गम भागातील शाळेतील शिक्षकांची समस्या प्रशासनापर्यंत पोहोचली आणि त्यावर तातडीने कार्यवाही झाली. त्यामुळे आपल्या शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या या विद्यार्थिनींच्या प्रयत्नांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.(Beed Bottle Mic Reporting)


Comments
Add Comment

PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra News: पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

Food And Drug Administration : FDA ची राज्यभरात मोठी कारवाई; 7 महिन्यांत 152.65 कोटींचा अन्नसाठा जप्त, 1,688 जणांना अटक

मुंबई : राज्यातील अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली

पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करा, मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

राज्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट लक्षात घेता राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आले आहे. ज्या गावांमध्ये

IAS officers Transfers : राज्यातील चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य शासनाने शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले.

Revenue Department : दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती आता आयकर विभागाला जाणार, महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिल्यास

सैनिकी शाळांतील प्रवेश आता केवळ गुणवत्तेच्या आधारेच; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील सैनिकी शाळांमध्ये पारदर्शक, उत्तरदायी आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्था निर्माण करण्यावर नव्या धोरणात भर