Monday, September 28, 2026

Asian Games 2026: एशियन गेम्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय? कोण ठरणार विजेता?

Asian Games 2026: एशियन गेम्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय? कोण ठरणार विजेता?
एशियन गेम्स 2026 स्पर्धेतील पुरूष क्रिकेट स्पर्धेत वारंवार पावसाचा व्यत्यय येत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे सामन्याशिवायच आयसीसी मानांकित संघांना पुढच्या फेरीचं तिकीट मिळत आहे. 28 सप्टेंबर 2026 रोजी उपांत्यपूर्व फेरीचे दोन सामने होणार होते. यात पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार होती. मात्र दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाले. पण आयसीसी मानांकनाच्या आधारावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना फायदा झाला आणि उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं. भारत आणि पाकिस्तान यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील विजेत्याशी होईल.  तर पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील विजेत्याशी होईल. आता उपांत्य फेरीत पाऊस पडला तर काय होणार? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.तर येथेही हाच नियम लागू होणार आहे. उपांत्य फेरीत पाऊस पडला तर आयसीसी मानांकनाच्या आधारावर अंतिम फेरीचं तिकीट मिळेल.

उपांत्य फेरीत पाऊस पडला तर, भारताला फायदा

नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्यपूर्व सामना पावसामुळे रद्द झाला, तर चांगल्या रँकिंगमुळे श्रीलंका थेट उपांत्य फेरीत येईल आणि भारताचा सामना श्रीलंकेशी होईल. उपांत्य फेरीत पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर भारताला फायदा होईल. भारतीय संघ आयसीसी टी20 रँकिंगमध्ये नंबर 1 वर असल्याने अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. श्रीलंका किंवा नेपाळ या दोन्ही संघांपेक्षा भारताचे रँकिंग सरस आहे. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा सामना पावसाने वाहून गेला, तर थेट फायनल गाठेल.

पाकिस्तानला मानांकनाचा लाभ मिळणार

उपांत्य फेरीत पाकिस्तानची लढत बांगलादेश विरूद्ध मलेशिया यांच्यातील विजेत्याशी होईल. उपांत्यपूर्व फेरीचा सामना रद्द झाल्यास वरच्या रँकिंगमुळे बांगलादेश उपांत्य फेरीत पोहोचेल. उपांत्य फेरीत पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर पाकिस्तानला फायदा होईल. पाकिस्तानचे टी20 रँकिंग बांगलादेश किंवा मलेशियापेक्षा सरस असल्यामुळे सामना रद्द झाल्यास पाकिस्तान थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.

अंतिम फेरीचं गणित काय?

समजा, उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यात पाऊस पडला तर त्याचा फायदा भारत आणि पाकिस्तान या संघांना होईल. म्हणजेच अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. जर या सामन्यात पाऊस पडला तर विजेता कोण? तर त्याचं उत्तर असं आहे की दोन्ही अंतिम स्पर्धकांना पदकं दिली जातील. म्हणजेच दोन्ही संघ सुवर्णपदकाचे मानकरी ठरतील. तीन वर्षांपूर्वी भारताने पुरुष क्रिकेट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. अंतिम सामन्यात अफगाणिस्तानशी लढत होणार होती. पण पावसामुळे सामना रद्द झाला आणि भारताला उच्च मानांकन आणि क्रमवारीमुळे सुवर्णपदक देण्यात आले होते. मात्र आता तसं नाही. आता पदक विभागून दिलं जाईल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >